मोदी अन् देशवासियांमुळे आम्हाला पुन्हा हुरूप : के. सिवन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

जेव्हा विक्रमचा संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा सर्वच शास्त्रज्ञांच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. या सर्व शास्त्रज्ञांनी या मोहिमेसाठी प्रचंड काम केले होते. यावेळी सर्व शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर निराशा असताना, 'विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही' असे म्हणत मोदींनी आम्हाला सर्वांनाच धीर दिला.

नवी दिल्ली : विक्रम लँडरचे स्थान समजल्याचे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितल्यानंतर भारतीयांच्या जीवात जीव आला. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटररने विक्रमचा फोटो पाठवला आहे. त्यामुळे विक्रम सुखरूप असल्याची माहिती सिवन यांनी दिली. विक्रमशी संपर्क तुटला होता, तेव्हा सर्वच शास्त्रज्ञांनी निराशा व्यक्त केली होती, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व देशवासियांनी दिलेल्या धीरामुळे पुन्हा आमचे मनोधैर्य उंचावले, असे सिवन यांनी सांगितले.

Chandrayaan 2: ‘विक्रम’ अभी जिंदा है! यानाने काढले लँडरचे फोटो

जेव्हा विक्रमचा संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा सर्वच शास्त्रज्ञांच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. या सर्व शास्त्रज्ञांनी या मोहिमेसाठी प्रचंड काम केले होते. यावेळी सर्व शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर निराशा असताना, 'विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही' असे म्हणत मोदींनी आम्हाला सर्वांनाच धीर दिला. सिवन जेव्हा भावूक झाले, तेव्हा मोदींनी त्यांना मिठीत घेतले व त्यांच्या दुःखाला वाट करून दिली. 

Chandrayaan 2 : पंतप्रधान म्हणतात, 'नवी पहाट उगवेल'

विक्रम चंद्रावर यशस्वी उतरू न शकल्याचे कळल्यावर सर्व देशानेच आम्हाला धीर दिला. सर्व देश आमच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. पंतप्रधानांचे एक नवीन रूप आम्हाला बघायला मिळाले, यामुळे आम्हा सर्व शास्त्रज्ञांना पुन्हा नव्याने हुरूप आला आहे, असे सिवन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. 

Chandrayaan 2 : के. सिवन यांच्यासह सारा देश हळहळला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi and Indian citizens gives us hopes says Isro head K Sivan