पंतप्रधान मोदीच विचारतायत... Hows the Josh!

पंतप्रधान मोदीच विचारतायत... Hows the Josh!

मुंबई : 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील एक संवाद सध्या कमालीचा लोकप्रिय झाला आहे.. Hows the Josh ! खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आज (शनिवार) हा संवाद म्हणण्याचा मोह आवरता आला नाही. निमित्त होतं पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौर्‍यातील एका कार्यक्रमाचे आणि समोर उपस्थित होते चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार..

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 'नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा'चे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, ''पायरसी रोखण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. त्यासाठी 'सिनेमाटोग्राफी अॅक्ट 1952' मध्ये घटनादुरुस्ती करण्याबाबत पावले उचलण्यात येणार आहेत. चित्रपट आणि समाज एकमेकांचे प्रतिबिंब आहे. आपण भारताची गरीबी आणि दीनता चित्रपटांच्या माध्यमातून पाहिली आहेत. मात्र, आता आपल्याकडे असे चित्रपट आहेत, तिथे प्रश्न असल्यास त्यावर उपायही असेल, असेही मोदी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com