भाजपला घराण्याचा नव्हे वैचारिक वारसा; मोदींचा घराणेशाहीवर प्रहार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

भाजप खासदारांच्या दोन दिवसीय अभ्यासवर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात छोटेसे संबोधन करताना मोदींनी कॉंग्रेसच्या घराणेशाहीवर प्राहर करण्याची आणकी एक संधी साधून घेतली. मोदी घराणेशाहीवर तुटून पडत होते तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काही सदस्यांसह भाजपमधील व सत्तारूढ पक्षाने अलीकडेच आयात केलेल्यांपैकी अस्सल घराणेशाहीचे प्रतीनिधीत्व करणाऱ्या खासदारांची काय भावना होती हे समजू शकले नाही. 

नवी दिल्ली : "भारतीय जनता पक्ष कोणत्याही घराण्याच्या वारशावर नव्हे तर विचारसरणीच्या पुण्याईवर आजच्या गौरवशाली स्थितीत पोहोचला आहे अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केल्याचे समजते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ट्‌विट करून मोदींनी खासदारांना संबोधित केल्याची माहिती दिली. 

भाजप खासदारांच्या दोन दिवसीय अभ्यासवर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात छोटेसे संबोधन करताना मोदींनी कॉंग्रेसच्या घराणेशाहीवर प्राहर करण्याची आणकी एक संधी साधून घेतली. मोदी घराणेशाहीवर तुटून पडत होते तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काही सदस्यांसह भाजपमधील व सत्तारूढ पक्षाने अलीकडेच आयात केलेल्यांपैकी अस्सल घराणेशाहीचे प्रतीनिधीत्व करणाऱ्या खासदारांची काय भावना होती हे समजू शकले नाही. 

पंतप्रधान उद्या (ता.4) समारोप कार्यक्रमात विस्ताराने खासदारांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास प्रसार माध्यमांना पूर्ण बंदी आहे. मात्र सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनी आज छोटा संवाद साधून खासदारांना, या कार्यशाळेचा पुरेपूर फायदा घ्या असे आवाहन केले.पंतप्रधानांनी सांगितले की केवळ निवडणुकांपुरते नव्हे तर पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळात खासदारांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकावे.

आपल्या भाषणाची टिपणे काढणाऱ्या खासदारांना ते म्हणाले की भाजप घराण्याच्या बळावर नव्हे तर विचारधारेवर आज येथे पोहोचला आहे हे खासदारांनी कागदावर उतरविण्यापुरते नव्हे तर नीटपणे समजून घ्यावे असे सांगून मोदी म्हणाले की कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवावा व संसदेतील चर्चांमध्येही सक्रिय सहभाग द्यावा. संसदेत आपल्या मतदारसंघांचे प्रश्‍न मांडताना कोणत्या पध्दतीने मांडावेत याचीही माहिती दिली जाणार आहे 

शहा यांनी ट्‌विटमध्ये म्हटले की या कार्यशाळेत विशेषतः नव्या भाजप खासदारांना पक्षाच्या विचारसरणीपासून संघटनात्मक बारकावे समजावून दिले जात आहेत. या अभ्यासवर्गाची नऊ भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. संसदेत व संसदेच्या बाहेरही भाजप खासदार म्हणून आपले आचरण कसे असावे व सतत जनतेशी जोडलेले राहताना जनतेही पक्षाची विचारसरणी कशी न्यावी, याबाबतचे धडे भाजप खासदारांना दिले जातील. 

आता पीए मंडळींचाही क्‍लास ! 
सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर विराजमान झालेल्या भाजपच्या बहुतांश मंत्री व खासदारांच्या आचार विचारांत "खुर्चीची उब' झळकू लागल्याची सार्वत्रीक भावना दिल्लीत बोलली जाते. त्यातही या खासदार व बहुतांश मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक (पीए) भलतेच अहंमन्यपणे वागू लागल्याचा सार्वत्रीक अनुभव असल्याचे चित्र दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तंयाचे वर्णन "चहापेक्षा किटली गरम' असे करतात. या पार्श्‍वभूमीवर यापुढच्या टप्प्यात या सहाय्यकांसाठीही असाच प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जाणार असल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. मोदी-1 सरकारच्या काळातही अशी कार्यशाळा म्हाळगी प्रोबदिनीत जाली होती. मात्र त्याचा परिणाम शून्य असल्याचे नंतर या सहाय्यकांच्या ताठ्यावरून दिसल्याचे सांगितले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi attacks congress again