सोनिया-राहुल मला काय प्रमाणपत्र देणार : नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असून, प्रमुख नेत्यांच्या सभा होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत असून, लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विलासपूर येथे घेतलेल्या सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थनही केले.

विलासपूर : नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य करत जे स्वतः आर्थिक गेैरव्यवहारप्रकरणी जामीनावर आहेत, तेच मला काय नोटाबंदीच्या निर्णयाचे प्रमाणपत्र देणार अशी टीका त्यांनी केली आहे. 

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असून, प्रमुख नेत्यांच्या सभा होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत असून, लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विलासपूर येथे घेतलेल्या सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थनही केले.

मोदी म्हणाले, की आर्थिक गैरव्यवहारामुळे आई आणि मुलगा जामीनावर फिरत आहेत. ते काय नोटाबंदीबाबत मोदींना प्रमाणपत्र देणार. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक बनावट कंपन्या समोर आल्या. अनेकांच्या घरात, बनावट कंपन्यांत लपविण्यात आलेले पैसे आम्ही बाहेर काढले आणि देशाच्या विकासात वापरत आहोत. त्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. नोटाबंदीमुळे सर्वांना बाहेर यावे लागले. ज्यांना भ्रष्टाचाराशिवाय काही सुचत नाही, ते स्वच्छ भारत, पर्यटन याची खिल्ली उडवितात. 

Web Title: pm Narendra Modi attacks Gandhi family on demonetization Chhattisgarh assembly election