पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतिहास घडवला; मोडला अटलबिहारी वाजपेयींचा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान बनण्याचा मान वाजपेयींना मिळाला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता.१३) माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा रेकॉर्ड मोडला आहे. वाजपेयी यांच्यानंतर सर्वात जास्त काळ सत्ता गाजवणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून मोदींनी हा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वाजपेयी यांनी २२६८ दिवस भारताचे पंतप्रधानपद भूषविले आहे. बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून हा विक्रम आतापर्यंत वाजपेयी यांच्या नावावर होता. मात्र, याबाबत गुरुवारी मोदींनी वाजपेयींना मागे टाकले आहे. 

राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोना; नरेंद्र मोदी होणार क्वारंटाईन?​

२६ मे २०१४ पासून मोदी आहेत भारताचे पंतप्रधान

Image may contain: 1 person, hat
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. आणि त्यानंतर २६ मे रोजी मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही मोदींचा करिष्मा कायम राहिला आणि ते सलग दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले. आता भारताच्या इतिहासात सर्वात जास्त काळ देशाचे पंतप्रधानपद भूषविणारे ते चौथे पंतप्रधान ठरले आहेत.

कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेस पीएम होते वाजपेयी

Image may contain: 1 person, glasses and close-up

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे ३ वेळा पंतप्रधान बनले. १९९६ मध्ये पंतप्रधान बनले, मात्र त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यानंतर १९९८ आणि १९९९ मध्ये ते पंतप्रधान बनले आणि २००४ पर्यंत ते सत्तेत राहिले. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान बनण्याचा मान वाजपेयींना मिळाला. 

Breaking: सचिन पायलट पोहोचले, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या घरी​

सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदी राहिले जवाहरलाल नेहरू

Image may contain: 5 people, night
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर सर्वात जास्त काळ पंतप्रधानपद भूषविण्याचा विक्रम अबाधित आहे. ते १६ वर्ष २८६ दिवस देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होते. त्यानंतर त्यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी १५ वर्ष ३५० दिवस देशाचे पंतप्रधानपद भूषविले आहे. 

तिसऱ्या स्थानी आहेत मनमोहन सिंग

Image may contain: 1 person, beard
पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर मनमोहन सिंग हे सर्वात जास्त काळ पंतप्रधानपद भूषविणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. ते १० वर्ष ४ दिवस देशाच्या पंतप्रधानपदी होते. २२ मे २००४ ते २६ मे २०१४ या काळात सिंग यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषविले.

Live Updates:सुशांतसिंह राजपूत प्रकरण, सुप्रीम कोर्टात काय चाललंय?​

सर्वात कमी काळ पंतप्रधानपदी राहिले गुलजारी लाल नंदा

Image may contain: 1 person, glasses and close-up 
भारताच्या सर्वात कमी काळ पंतप्रधानपदी राहण्याचा रेकॉर्ड आहे गुलजारी लाल नंदा यांच्या नावावर. लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर ११ जानेवारी ते २४ जानेवारी १९६६ म्हणजे फक्त १३ दिवस नंदा कार्यवाहक पंतप्रधान राहिले होते. त्याआधी जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतरही २७ मे ते ९ जून १९६४ या काळात त्यांनी कार्यवाहक पंतप्रधानपद भूषविले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pm Narendra Modi break record of Vajpayee and becomes Longest Serving Indian Pm