पंतप्रधान मोदींची दिवाळी यंदा सीमेवरील जवानांसोबत

टीम ई-सकाळ
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष ताबारेषेवर जवानासोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान मोदी यांनी दिवाळीसोबतच लष्कराचाय पायदळ दिवसही साजरा केला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष ताबारेषेवर जवानासोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान मोदी यांनी दिवाळीसोबतच लष्कराचाय पायदळ दिवसही साजरा केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरील आर्मी  ब्रिगेट हेड कॉर्टर्समध्ये पोहोचले. 2014मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनी तिसऱ्यांना सीमाभागात जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यंदाच्या ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच ताबारेषेवर पोहोचले आहेत.

आदित्य ठाकरेंसोबत समन्वयाने काम करणार

कधी कोठे साजरी केली दिवाळी?
2014मध्ये पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर नरेंद मोदी यांनी पहिल्यांदा लडाखमधील सियाचीन परिसरात जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर 2017मध्ये त्यांनी काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये दिवाळी साजरी केली होती. तर, 1965च्या युद्धातील विजयाला पन्नास वर्षे  पूर्ण झाल्यानिमित्त 2015मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेवर दिवाळी साजरी केली होती.

पुण्यात मोदींच्या सभेमुळे वाचली भाजपची लाज

काय आहे पायदळ दिवस?
1947मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. त्यांना पिटाळून लावण्यासाठी भारतीय सैन्य काश्मीरमध्ये दाखल झाले. त्या निमित्तानं आजही लष्कर पायदळ दिन साजरा करतं. यंदा दिवाळीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये पायदळ दिन साजरा केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi celebrates diwali with army men rajouri jammu kashmir