मोदींकडून केदारनाथचे दर्शन; जवानांसोबत दिवाळी साजरी 

Narendra Modi
Narendra Modi

उत्तरकाशी : उत्तरखंडच्या भारत-चीन सीमेवरील हर्सिल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांनी आपल्या हातांनी जवानांना मिठाई भरविली. तसेच त्यांनी केदारनाथचे दर्शन घेत पूजा केली. 

दिवाळीनिमित्त जवानांना शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, की बर्फाळ आणि अतिशय दुर्गम अशा भागात आपण देशाची सेवा करीत आहात त्याने भारत अधिक बलशाली होत आहे. देशातील 125 कोटी जनतेच्या स्वप्न आणि जे भविष्य आहेत त्याची आपण सुरक्षा करीत आहात. दिवाळीनिमित्त माझ्या आपणास मन:पूर्वक शुभेच्छा आहेत. प्रत्यक्ष मोदींबरोबर दिवाळी साजरी करण्याचा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय असेल अशा भावना यावेळी जवानांनी व्यक्त केल्या. 

मी गुजरातचा मुख्यमंत्री असतानाही दिवाळीत जवानांची भेट घेतली होती. त्यालाही आता काही वर्षे उलटून गेली आहेत. त्यावेळी इंटो तिबेटीन सीमा पोलिस (आयटीबीपी) जवानांसोबत दिवाळी साजरी केल्याचे मला आठवते असेही मोदी यावेळी म्हणाले. केदारनाथचे दर्शन घेत त्यांनी परिसरातील कामांची पाहणी केली. मोदींनी तिसऱ्यांदा केदारनाथला भेट दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com