International Yoga Day 2019 : मोदींनी 40 हजार नागरिकांसह केला योगदिन साजरा

टीम ईसकाळ
शुक्रवार, 21 जून 2019

मोदींनीच प्रथम योगदिनाची कल्पना संयुक्त राष्ट्रांसमोर मांडली होती. ती जगभराने स्विकारली व 21 जून 2015 पासून हा दिवस योगदिन म्हणून साजरा करण्यास सुरवात केली.

रांची : 21 जून हा जगभरात जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ राजकीय नेत्यांपर्यंत हा सगळ्यांनी योग दिन साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रांचीमध्ये 40 हजार नागरिकांसह पहाटे योग करत योगदिन साजरा केला. 

मोदींनीच प्रथम योगदिनाची कल्पना संयुक्त राष्ट्रांसमोर मांडली होती. ती जगभराने स्विकारली व 21 जून 2015 पासून हा दिवस योगदिन म्हणून साजरा करण्यास सुरवात केली. रांची येथे प्रभात तारा मैदानावर योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 'योग ही आपल्या देशाची परंपरा आहे, ती परंपरा आपण सर्व स्तरावर पोहोचवणे गरजेचे आहे,' असे मत मोदींनी मांडले. जगभरात क्लायमेट अॅक्शन या थीम अंतर्गत योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे हरयाणा येथील रोहतक या ठिकाणी योगासनं करणार आहेत. तर नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू रामदेवबाबांसोबत योगासनं केली.     

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi celebrates Yoga Day at Ranchi