पंतप्रधानांचा थेट जनतेशी संवाद

पंतप्रधानांचा थेट जनतेशी संवाद

नवी दिल्ली - नोटाबंदीवरून तमाम विरोधकांनी संसदेत चढविलेल्या चौफेर हल्ल्याचे एकमेव लक्ष्य असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयावरून थेट 125 कोटी देशवासीयांच्या जनसंसदेचे दरवाजेच खटखटवले आहेत. मोदी यांनी आज दुपारी एका ट्विटद्वारे जनतेला नोटाबंदीबाबत दहा प्रश्‍नांची प्रश्‍नावली जाहीर करून नरेंद्र मोदी ऍपवर त्या प्रश्‍नांची उत्तरे पाठविण्याचे आवाहन केले.

नोटाबंदीवरून मोदी यांनी संसदेत येऊनच बोलावे असा हट्ट धरून विरोधकांनी राज्यसभा व लोकसभाही चार दिवस ठप्प केली आहे.

विरोधकांच्या मागणीवर मौन बाळगणारे मोदी या आठवड्यात बोलणार असे भाजपमधून सांगितले जात असले, तरी राज्यसभेत काल "नरेंद्र मोदी चोर है,' यांसारख्या अभिरुचीहीन घोषणा कॉंग्रेसकडून दिल्या गेल्याने पंतप्रधानांचे संसदेतील बोलणे आणखी अनिश्‍चित झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी आज दुपारी एक ट्विट करून देशवासीयांना उद्देशून ही प्रश्‍नावली जारी केली. यातील पहिला व पाचवा प्रश्‍न एकसारखाच दिसत आहे. मोदी यांनी म्हटले आहे, की 500 व एक हजार रुपयांच्या चलनी नोटांबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत मी तुमचे (जनतेचे) प्रथमदर्शनी मत जाणून घेऊ इच्छितो. नरेंद्र मोदी ऍपवरील या सर्वेक्षणात सहभाग घ्या आणि तुमच्या सूचना मला जरूर कळवा. त्यानंतरच्या काही मिनिटांतच याचे हजारोंच्या संख्येने रीट्विट झाले. भाजपसह संघपरिवाराची सायबर योद्‌ध्यांची फौजही सरसावली व मोदी यांच्या ऍपवर सूचनांचा व जनतेच्या उत्तरांचा इतका पाऊस पडला, की या ऍपचा वेग काही मिनिटांत प्रचंड मंदावला.

पंतप्रधान मोदी यांची प्रश्‍नावली अशी -
1) नोटाबंदीवरील सरकारच्या निर्णयावर तुम्ही काय विचार करता?
2) भारतात काळा पैसा आहे असे तुम्हाला वाटते का?
3) भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरुद्ध लढायला हवे असे तुम्हाला वाटते काय?
4) भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारच्या प्रयत्नांबद्दल तुमचे मत काय?
5) नोटाबंदीच्या निर्णयावर तुमचे काय मत आहे?
6) नोटाबंदीमुळे दहशतवादाला वेसण बसेल का? नोटबंदीमुळे भ्रष्टाचार, काळा पैसा व दहशतवाद थांबेल काय?
7) नोटाबंदी निर्णयानंतर उच्चशिक्षण आणि रियल इस्टेट क्षेत्र सामान्य माणसाच्या आवाक्‍यात येईल का?
8) नोटाबंदीमुळे तुमची किती अडचण झाली आहे?
9) भ्रष्टाचाराच्या विरोधात असलेले आता त्याच्याच पाठिंब्यासाठी लढत आहेत काय?
10) नोटबंदीवर तुम्ही (मला) काही सूचना देऊ इच्छिता का?
(तुमचे मत व्यक्त करण्यासाठी http://nm4.in/dnldapp या लिंकवर क्‍लिक करा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com