कर्तारपूर कॉरिडॉरसाठी मोदींचे अमेरिकी शीख समुदायाकडून अभिनंदन

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

वॉशिंग्टन : कर्तारपूर कॉरिडॉरचे भूमिपूजन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अमेरिकेतील शीख समुदायाने पंतप्रदान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. 

वॉशिंग्टनच्या मेरीलॅंड येथील शीख्स ऑफ अमेरिकाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि त्याची प्रत भारतीय दूतावासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सुपूर्त करण्यात आली.

प्रस्तावात म्हटले, की 26 नोव्हेंबर 2018 रोजी कर्तारपूर कॉरिडॉरचे भूमिपूजन केल्याबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे अभिनंदन. भारतात आणि परदेशात राहणाऱ्या शीख समुदायाचे स्वप्न पूर्ण केल्याबद्धल आभारी आहोत. त्याच वेळी पाकिस्ताननेदेखील भूमिपूजन केल्याने जगभरातील शीख समुदाय कर्तारपूरची यात्रा करण्यासाठी उत्सुक आहे.

1984 रोजीच्या शीखविरोधी दंगलप्रकरणी दोषींना शिक्षा दिल्याबद्धल भारत सरकारचे कौतुक केले आहे. संघटनेचे प्रमुख जसदीप सिंग म्हणाले, की गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि परदेशांत राहणाऱ्या शीख समुदायासाठी चांगल्या बातम्या येत आहेत.

दंगलीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, की शेवटी आम्हाला अंधारात आशेचा किरण निर्माण झाला आहे. अर्थात अजूनही बरेच काही काम करणे बाकीचे आहे.

Web Title: PM Narendra Modi Congratulated for Kartarpur corridor