लसीच्या किंमतीवरून राजकारण तापले; सोनिया गांधींचे PM मोदींना पत्र

1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस (Covid Vaccine) दिली जाणार आहे. दुसरीकडे, कविशिल्ड बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) लसीच्या किंमतीची घोषणा केली आहे.
soniya gandhi and narendra modi
soniya gandhi and narendra modiSakal Media

नवी दिल्ली- 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस (Covid Vaccine) दिली जाणार आहे. दुसरीकडे, कविशिल्ड बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) लसीच्या किंमतीची घोषणा केली आहे. यावर काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारच्या लस नीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात म्हणण्यात आलंय की, 18 वर्षांपुढील सर्वांना, त्यांची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी लस देण्यात यावी. लसींच्या वेगवेगळ्या किंमतीबाबत सरकारने हस्तक्षेप करावा.

soniya gandhi and narendra modi
गरोदरपणात कोरोना टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

सरकारच्या नीतीमुळेच सीरम इन्स्टिट्यूटने वेगवेगळ्या किंमतीची घोषणा केली आहे. कंपनीने जारी केलेल्या किंमतीनुसार, केंद्र सरकारला लस 150 रुपयांना, राज्य सरकारला 400 रुपयांना आणि खासगी हॉस्पिटलमध्ये लशीचा एक डोस 600 रुपयांना मिळेल. यामुळे नागरिकांना लशीसाठी जास्त किंमत मोजावी लागेल आणि राज्य सरकारांवर आर्थिक बोजा पडेल, असं म्हणत सोनिया गांधींनी लशींच्या वेगवेगळ्या किंमतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीची किंमत उत्पादक कंपनीने जाहीर करताच राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर कडाडून टीकास्त्र सोडताना एक देश-एक किंमत अशी आग्रही मागणी केली.

soniya gandhi and narendra modi
Corona Virus: मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा 6 लाखांच्या पार

सीरमने खासगी रुग्णालयांना 600 तर सरकारी रुग्णालयांना 400; केंद्र सरकारला 150, तर राज्य सरकारला 400 रुपये असा दर जाहीर केला. यावरून विरोधक आक्रमक झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी हा दर पूर्णपणे अमान्य असल्याचे म्हणत नाराजीचा सूर लावला. केंद्राने लस खरेदी करून राज्यांना लसीचे निःशुल्क आणि सम प्रमाणात वाटप करावे, अशी मागणी केली. पीएम केअर्स निधीमध्ये साठविलेले कोट्यवधी रुपये पंतप्रधानांनी या कामासाठी द्यावेत, अशी सूचना करताना येचुरी यांनी, मागील 70 वर्षांत देशामध्ये निःशुल्क सार्वत्रिक लसीकरण मोहीम राबविण्यात आल्याकडेही लक्ष वेधले.

सरकारी रुग्णालयात ४०० रुपये किंमत लाभार्थ्याने चुकवायची आहे की राज्य सरकारने असा खोचक सवाल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही लसीकरण किमतीवरून केला. ते म्हणाले की १८ ते ४४ वयोगटातील किती लाभार्थी ४०० रुपये प्रति डोस दर देऊ शकतात. लाभार्थ्यांना किती दर मोजावा लागेल, किती राज्यांची या लसीकरणाची किंमत चुकविण्यासाठी आणि लाभार्थ्यांना अंशदान देण्याची आर्थिक क्षमता आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com