नवी दिल्ली : देशात सर्वत्र अर्थसंकल्पाची चर्चा केली जात असताना विरोधकांकडून इव्हीएमच्या मुद्यावरून टीका केली जात आहे. आता तुम्ही खूप घाबरले आहात. त्यामुळे तुम्हाला आता झालं तरी काय?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) केला. तसेच मोदींवर टीका करणे चांगली बाब आहे. मात्र, देशावर टीका करणे चुकीचे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधानांनी लोकसभेत आभार प्रस्ताव सादर केला. यावेळी ते म्हणाले, काँग्रेसकडून विविध मुद्यांवर टीका केली जात आहे. त्यांच्याकडून न्यायपालिकेवरही टीका केली जात आहे. आता तर न्यायव्यवस्थेला धमकाविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे :
- काँग्रेसकडून लष्करप्रमुखांवर टीका केली जात आहे. इतकेच नाहीतर न्यायपालिकेवरही टीका केली जात आहे.
- न्यायव्यवस्थेला धमकाविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- सरकारचा पैसा भ्रष्टाचारावरील कारवाईसाठी खर्च
- लोकसभेसाठी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांचे स्वागत
- निवडणुका आहेत म्हणून देशातील जनतेसमोर कामांचा लेखाजोखा
- आव्हानांना आव्हान देण्यात आम्ही पूर्ण ताकदीने पुढे आलोय.
- पुढच्या निवडणुकीसाठी सर्व विरोधकांना शुभेच्छा
- देश साडेचार वर्षांपूर्वी काय होता आणि त्याचा आता काय विकास झालाय हे आपण पाहत आहोत.
- जागतिक पातळीवर भारताचा क्रमांक 11 व्या क्रमांकावर होता आता हा क्रमांक सहाव्या क्रमांकावर गेला आहे.
- मोबाईल निर्मिती करणारा भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे.
- इंटरनेट डाटा सर्वात स्वस्त झाली असून, याचा वापरही जास्त होत आहे
- मोदींवर टीका करणे चांगली बाब. मात्र, देशावर टीका करणे चुकीचे
- मोदी संस्थांना नष्ट करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर मोदी म्हणाले, 'उलटा चोर, चौकीदार को दांटे'
- देशाच्या लष्करप्रमुखांना गुंड म्हणून संबोधण्यात आले, ही बाब अत्यंत गंभीर आहे. हे तुमचे पाप.
- सेनेने कोणतेही पाप केले नाही. मात्र, तुम्ही जे केले चुकीचे आहे
- निवडणूक आयोग देशासाठी गौरवास्पद.
- देश बजेटची चर्चा करतोय आणि विरोधक इव्हीएमची करतोय.
- तुम्ही खूप घाबरलात. काय झालं काय तुम्हाला.
- काँग्रेसच्या पंतप्रधानांनी योजना आयोगाला 'जोकरांचा समूह' म्हटले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.