'मोदी..मोदी'च्या घोषणांमध्ये ओडिशात पंतप्रधानांचे स्वागत 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

भुवनेश्‍वर: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यकर्ते आणि सामान्य जनतेने उत्साहात स्वागत केले. बैठकीच्या स्थळी जाताना पंतप्रधान मोदी यांनी नऊ किलोमीटर 'रोड शो' केला. 

ओडिशाचे मुख्य सचिव ए. पी. पढी आणि पोलिस महासंचालक के. बी. सिंग यांनी राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांचा हा ओडिशा दौरा राजकीय पक्षासाठी असल्याने राज्यपाल एस. सी. जमीर आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले नव्हते. 

'रोड शो'च्या मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती. पंतप्रधान मोदी यांनी या गर्दीला अभिवादन केले. कडक उन्हामध्ये स्वागतासाठी जमलेल्या त्या गर्दीसाठी मोदी यांनी सुरक्षेचे कवच दूर करत काही जणांशी हस्तांदोलनही केले. ओडिशातील स्वातंत्र्यसैनिका आणि येथील वीरांच्या स्मारकास मोदी यांनी वंदन केले. मोदी यांच्या 'रोड शो'दरम्यान 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' आणि 'मोदी..मोदी' अशा घोषणा दिल्या जात होत्या. 

भाजपच्या महिला मोर्चातील सदस्यांनी पंतप्रधान मोदी यांचे राजभवनावर स्वागत केले. राजभवनात 20 मिनिटे थांबून मोदी यांनी पुन्हा 'रोड शो' केला. यावेळी ते अर्धा किलोमीटर चालत गेले.

Web Title: PM Narendra Modi gets rousing welcome in Odisha