पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटावर धमकीचा संदेश मिळाला आहे. हा संदेश मल्याळम भाषेत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोदी यांनी 8 जून रोजी केरळमधील गुरूवायूर मंदिराला भेट दिली होती. भेटीपूर्वी एक दिवस आधी 7 जून रोजी हा धमकीचा संदेश मिळाला आहे. मंदिराच्या कार्यालयाला एक लिफाफा पाठविण्यात आला होता. या लिफाफ्यातील पत्रात मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पाचशे रूपयांच्या नोटावर धमकीचा संदेश मिळाला आहे. शिवाय, त्यावर इंग्रजी भाषेत काही शब्द होते मात्र ते शब्द काही कोड असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मालदीव दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान या मंदिरात भेटीसाठी गेले होते. धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे. मोदींना धमकी मिळाल्यानंतर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने याला गंभीरतेने घेत याची सर्व माहिती सुरक्षा संस्थेला दिली आहे. सुरक्षा संस्थेने त्यानंतर मोदी यांच्या सुरक्षेची तपासणी केली.

दरम्यान, दोन जून रोजी राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे दिली होती. राजस्थानमधील भाजप अध्यक्ष मदन लाल सैनी यांना एक पत्र लिहून अज्ञात व्यक्तीने मोदींना मारण्याची धमकी दिली होती. हे प्रकरण त्यावेळी तात्काळ पोलिसांकडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ चार संशयीत आरोपीची चौकशी केली होती. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 2018 मध्ये दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांच्याकडे मोदींना मारण्याच्या धमकीचा मेल पाठवला होता.

मोदींच्या शपथविधी समारंभाआधी भाजपच्या प्रदेश मुख्यालयाला एक पत्र आले होते. त्यामध्ये मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने हे निनावी पत्र आले होते. त्यावर भाजपच्या मुख्यालयाचा पत्ता देण्यात आला होता. चिठ्ठीत लिहिले होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभात त्यांच्या छातीत गोळ्या झाडण्यात येणार आहेत. ही चिठ्ठी पाठवणाऱ्याने आपले नावही दिले होते. त्या चिठ्ठीवर पाठवणाऱ्याचा पत्ताही देण्यात आला होता. या धमकीपत्रात राकेश टांक, भैय्या पारीक, आणखी एकाचा उल्लेख होता. या चिठ्ठीवर देण्यात आलेला पत्ता हा जयपूरचा होता. चिठ्ठीमध्ये जयपूरमधल्या आमेर रोडवरच्या कच्चा बंधा, गणेश कॉलनीतील शिवाड भागाचा पत्ता देण्यात आला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी चिठ्ठी मिळाल्यानंतर आम्ही ती पोलिसांच्या हवाली केली होती असे सांगितले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com