मनमोहनसिंग यांना 87 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस आहे. ते ८७ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या या जन्मदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस आहे. ते ८७ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या या जन्मदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त अनेक दिग्गजांनी मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान केले आहे. 

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ. सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे. 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली . त्यानंतर 1962 साली डॉ. सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली. त्यांचे ‘इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स अन्ड प्रोस्पेक्ट्स फोर सेल्फ ससटेन्ड ग्रोथ’ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे.

२००४ ते २०१४ या कार्यकाळात यूपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. पण मनमोहन सिंग यांच्यावर कोणताही डाग उमटला नाही. मनमोहन यांच्यावर न बोलण्याचा आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण आपल्या शांत, संयमी स्वभावाने त्यांनी अनेकांची मने जिंकली. आज त्यांच्या वाढदिवसांनिमित्त त्यांना सकाळ टीमकडून शुभेच्छा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi gives birthday wishesh to ex pm manmohan singh