Narendra Modi: यावर्षीचा पहिला रोजगार मेळा संपन्न, पंतप्रधानांनी स्वतः वाटले 71 हजार जॉइनिंग लेटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

Narendra Modi: यावर्षीचा पहिला रोजगार मेळा संपन्न, पंतप्रधानांनी स्वतः वाटले 71 हजार जॉइनिंग लेटर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वार १0 लाख कर्मचार्‍यांसाठी 'रोजगार मेळावा' भरती मोहिमेअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये सुमारे 71 हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे सुपूर्द केली. (PM Narendra Modi gives out 71000 appointment letters under Rozgar Mela )


नियुक्तीपत्रे मिळालेले युवक कनिष्ठ अभियंता, लोको-पायलट, तंत्रज्ञ, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, लघुलेखक आणि कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, आयकर निरीक्षक, शिक्षक, परिचारिका, डॉक्टर आणि सुरक्षा अधिकारी या पदांसाठी पात्र आहेत. देशभरातील विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती केली जाईल.

नियुक्ती पत्रांचे वितरण केल्यानंतर, पंतप्रधानांनी काही उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांनी त्यांचा जीवन प्रवास शेअर केला. 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्यासाठी 2022 मध्ये पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 'रोजगार मेळा' मोहिमेचा हा एक भाग आहे.

रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने हे एक पाऊल असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 'रोजगार मेळा' पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

कर्मयोगी मॅनेजमेंट मॉड्यूल हा विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन इंडक्शन कोर्स आहे. यामध्ये सरकारी नोकरांसाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणी नीतिमत्ता, सचोटी आणि मानवी संसाधन धोरणे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modi