Narendra Modi : PM मोदींचा वर्ग खोटा? चित्रातल्या खिडकीवरुन होतायत ट्रोल

या वर्गात फक्त ५ विद्यार्थी आहे. त्यामुळे हा वर्ग फोटोशूटसाठी बनवल्याची चर्चा आहे.
PM Narendra Modi in Classroom
PM Narendra Modi in ClassroomSakal

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल गुजरातमध्ये मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसून त्यांच्याशी संवाद साधला. एका विद्यार्थ्याने सादर केलेलं प्रेझेन्टेशन त्यांनी तिथे बसूनच ऐकलं. दरम्यान, आता त्यांच्या या वर्गाची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

PM मोदींचा हा वर्ग खोटा असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. नेटकऱ्यांनी मोदी ज्या वर्गात बसलेत तो वर्ग केवळ एक सेट असल्याचा दावा केला आहे. वर्गातली एक खिडकी खोटी असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ही खिडकी नसून केवळ एक चित्र आहे, असं दिसत आहे. शिवाय वर्गामध्ये बेंचच्या खाली स्टुडिओत असल्यासारखं राखाडी रंगाचं मऊ कारपेटही दिसून येत आहे.

त्यामुळे मोदींचा हा वर्ग केवळ पिक्चरच्या सेटप्रमाणे असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. काहींनी याची तुलना मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातल्या हॉस्पिटलच्या सेटशी केली आहे. मोदी ज्या वर्गात बसले आहेत, त्यात केवळ पाच विद्यार्थी यावरुनही त्यांच्या चेष्टा केली जात आहे. तसंच हा वर्ग फक्त फोटोशूटसाठी बनवला आहे, अशीही चर्चा केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com