PM Narendra Modi : भाजपच्या महिला कार्यकर्त्यासमोर पंतप्रधान झुकतात तेव्हा... कर्नाटकात नेमकं काय घडलं?

PM Narendra Modi : भाजपच्या महिला कार्यकर्त्यासमोर पंतप्रधान झुकतात तेव्हा... कर्नाटकात नेमकं काय घडलं?

धारवाड: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एक प्रसंग घडला. एक महिला कार्यकर्त्या पंतप्रधानांना अभिवादन करण्यासाठी पुढे सरसावल्या. मात्र पंतप्रधानांनी स्वतःच महिलेसमोर झुकत त्यांचा सन्मान केला

धारवाड येथे 10 लेनच्या बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वेचे उद्घाटन आणि इतर कामांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. मंड्याजवळील गेज्जलगेरे येथे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपचे अनेक नेते मंचावर रांगेत उभे होते. ते कार्यक्रमस्थळी येताच एक महिला नेत्या त्यांना अभिवादन करण्यासाठी पुढे सरसावल्या. पण खुद्द मोदींनी त्यांच्यासमोर झुकत त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

धारवाडमधील आयआयटी कॅम्पसच्या उद्घाटनावेळी, विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) नेते चेतन राव आणि बजरंग दलाचे रघु हे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मोदींना पाहताच भावूक चेतन राव त्यांच्या पाया पडले आणि मोदींनीही चेतन यांच्या पायाला हात लावला.

रघु यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, आम्ही मोदीजींच्या स्वागतासाठी रांगेत उभे होतो. चेतन राव यांनी मोदींना अभिवादन केलं. परंतु मोदींनी नकार दिला. तरीही चेतन राव पुढे गेले आणि नतमस्तक झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी राव यांच्यासमोरच झुकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com