'पंतप्रधान मोदी दहशतवाद्यासारखे दिसतात'

'पंतप्रधान मोदी दहशतवाद्यासारखे दिसतात'

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवाद्यासारखे दिसतात. देशाला त्यांची भीती वाटते. ते देशातील जनतेला घाबरवत आहेत, असे वादग्रस्त विधान काँग्रेसच्या नेत्या विजयाशांती यांनी केले. तसेच मोदींच्या कार्यकाळात लोकशाहीची हत्या करण्यात आली. लोकांना अडचणीत आणण्याचे काम मोदींनी केले, असेही त्या म्हणाल्या. 

तेलंगणा येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. त्यावेळी विजयाशांती यांनी हे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या दहशतवाद्यासारखे दिसतात. कधी ते आपल्यावर कोणता बॉम्ब टाकतील, याची सतत भीती वाटते. त्यामुळे पंतप्रधान मोदींना सगळेच लोक घाबरत आहेत. ते जनतेवर प्रेम करण्याऐवजी जनतेलाच घाबरवत आहेत. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने कसे नसावे, याचे उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी''.  

मोदींच्या काळात लोकशाहीची हत्या

मोदींच्या कार्यकाळात लोकशाहीची हत्या करण्यात आली. लोकांना अडचणीत आणण्याचे काम मोदींनी केले. पुढील पाच वर्षांत ते हेच काम करण्यासाठी निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

राहुल गांधी यांची लोकशाही व्यवस्थेसाठी लढाई

राहुल गांधी लोकशाही व्यवस्थेसाठी लढाई लढत आहेत. तर नरेंद्र मोदी हे एका हुकूमशहासारखे काम करीत आहेत. मात्र, लोक त्यांना ती संधी देणार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com