PM Modi Birthday: मोदींवरही 'उद्धव ठाकरे फीवर'; परदेशातून चित्ते भारतात येताच...

PM Narendra Modi
PM Narendra ModiSakal

नामिबियातून आज ८ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हे चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. या चित्त्यांना मध्य प्रदेशातल्या कुनो अभयारण्यात ठेवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त हे चित्ते भारतात आणण्यात आले आहेत.

यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावरही 'उद्धव ठाकरे फीवर' दिसून आला. चक्रावलात ना? उद्धव ठाकरे फीवर म्हणण्यामागचा उद्देश म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी स्वतः हातात कॅमेरा घेऊन या चित्त्यांचे फोटो काढताना दिसले. उद्धव ठाकरेंची फोटोग्राफीची आवड तर सर्वश्रुतच आहे. आता मोदीही चित्त्यांचे फोटो काढताना दिसले. त्यामुळे त्यांच्यावर उद्धव ठाकरे फीवर दिसतोय! यापूर्वीही त्यांनी स्वतः कॅमेऱ्यातून विविध फोटो काढले आहेत. कधी वाघांचे, कधी बदकांचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी काढलेले आहेत. याशिवाय मोठमोठ्या नेत्यांसोबत सेल्फी काढतानाही पंतप्रधान मोदी दिसून आले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त नामिबियामधून ८ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. या आठ चित्त्यांमध्ये ५ नर आणि ३ मादी चित्ते आहेत. मध्य प्रदेशातल्या कुनो अभयारण्यात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत या चित्त्यांना सोडण्यात आलं आहे. गेल्या जवळपास ७० वर्षांपासून भारतात चित्यांचा वावर नाही. त्यामुळे नामिबियातून हे चित्ते आणण्यात आले आहेत. यावेळी स्वतः पंतप्रधान मोदींनी कॅमेऱ्यातून या चित्त्यांचे फोटो काढले आहेत.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com