पंतप्रधान मोदी यांची अविश्वास ठरावाचा सामना करण्यापूर्वी पाच प्रमुख मंत्र्यांशी बैठक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली. ज्यात पक्षाचे अध्यक्ष अमित शाह आणि मंत्री राजनाथसिंह, सुषमा स्वराज, नितीन गडकरी आणि अनंत कुमार ही नावे सामिल होती.

नवी दिल्ली : आज संसदेत विरोधकांचा पाठिंबा असलेल्या अविश्वास ठरावाचा सामना करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली. ज्यात पक्षाचे अध्यक्ष अमित शाह आणि मंत्री राजनाथसिंह, सुषमा स्वराज, नितीन गडकरी आणि अनंत कुमार ही नावे सामिल होती. 

नो ट्रस्ट मोशनला पराभूत करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ आहे. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, पंतप्रधान यांनी या ठरावाला संसदेत उपस्थित असलेले त्यांचे खासदार मतदान करतील याची या बैठकीतून खात्री करुन घेतली आहे.   

राज्यसभेत गेल्या वर्षी इतर मागासवर्गीय आयोगास घटनात्मक दर्जा देण्याची राज्यसभेत दुरुस्ती करण्यासाठी सादर करण्यात आलेले विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारकडे योग्य संख्याबळ नव्हते. लोकसभेने हे विधेयक आधीच मंजूर केले होते आणि  विधेयकाबाबत आयोगाला तक्रारींची चौकशी करण्याचे आणि दिवाणी न्यायालयाच्या बरोबरीच्या अधिकारांची चौकशी करण्याचे अधिकार दिले होते. सत्तारुढ पक्षाचे काही सदस्य आणि मंत्री या वादविवाद आणि मतदानाच्या वेळी हजर नसल्याने हे विधेयक विरोधकांच्या दुरस्तीप्रमाणे मंजूर झाले होते. 

याची पुनरावृत्ती टाळायला पाच प्रमुख नेत्यांची ही बैठक पंतप्रधान मोदी यांनी घेतल्याचे समजते. भाजप सध्या आपल्या सगळ्या मंत्र्यांना एकत्रित ठेवण्यावर जोर लावत आहे. दुराग्रही पक्ष आणि मित्रपक्षांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात भाजपची भुमिका आहे. 

Web Title: PM Narendra Modi Met BJPs Five Top Lieutenants Before No Trust Vote