PM Modi Nobel : नरेंद्र मोदी शांततेचं नोबेल मिळणार? समितीच्या उपाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं... | Pm narendra modi Nobel peace prize committee chief clears the confusion | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi
PM Modi Nobel : नरेंद्र मोदी शांततेचं नोबेल मिळणार? समितीच्या उपाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं...

PM Modi Nobel : नरेंद्र मोदी शांततेचं नोबेल मिळणार? समितीच्या उपाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. पुरस्कार समितीच्या उपाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे या चर्चा सुरू झाल्या आहे. मात्र त्यांनीच आता याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

सध्या सोशल मीडियासह काही माध्यमांमध्येही पंतप्रधान मोदी शांततेच्या नोबेल पुरस्काराचे दावेदार असल्याची चर्चा सुरू आहे. नोबेल पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष अस्ले तोजे यांच्या एका विधानामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता त्यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिलं आहे. मोदी नोबेलचे दावेदार आहेत, असं मी काहीही म्हटलो नाही, असं तोजे यांनी स्पष्ट केलं आहे.

याबद्दल बोलताना अस्ले तोजे म्हणाले, "एका खोट्या बातमीचं ट्वीट समोर आलं होतं. मला वाटतं की आपण त्या बातम्यांना खरं मानायला नको. ती खोटी बातमी आहे, त्यावर चर्चा करायला नको. संबंधित ट्वीटमध्ये जे काही लिहिलं होतं, तसं मी काहीही बोललो नाही. ट्वीटमधली विधानं मी स्पष्टपणे नाकारत आहे."

काय म्हणाले होते अस्ले तोजे?

नोबेल पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष अस्ले तोजे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी रशिया युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेचं कौतुक केलं. तोजे म्हणाले, "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची समजूत काढायचा प्रयत्न केला. मोदींनी कोणतीही धमकी न देता युद्धाच्या परिणामांबद्दल कड़क संदेश दिला. आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा नेत्यांची आवश्यकता आहे. "