370 कलम हटविण्याबाबत मोदींचा 'तो' फोटो व्हायरल

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असताना त्यांनी 370 कलम हटविण्यासाठी आंदोलन केले होते. यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर 370 कलम हटाओ आतंकवाद मिटाओ, देश बचाओ असे लिहिले होते.

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारस केंद्र सरकारने केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघ प्रचारक असताना केलेल्या आंदोलनाचा फोटो व्हायरल झाला आहे.

जम्मू काश्मीरचे द्विविभाजन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मांडला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी आज (सोमवार) राज्यसभेत याबाबत प्रस्ताव मांडला. जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव आम्ही मांडला आहे. कलम 370 काही कलम वगळण्यात येणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी झाल्यानंतर नवे नियम लागू होतील.

मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असताना त्यांनी 370 कलम हटविण्यासाठी आंदोलन केले होते. यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर 370 कलम हटाओ आतंकवाद मिटाओ, देश बचाओ असे लिहिले होते. योगायोगाने आज हा ऐतिहासिक निर्णय घेताना मोदीच पंतप्रधान आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi photo viral on social media about article 370