नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात स्नान करणारे दुसरे पंतप्रधान; 'हे' होते पहिले

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रयागराज येथे त्रिवेणी संगमानत स्नान केले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यानंतर स्नान करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते.

प्रयागराज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रयागराज येथे त्रिवेणी संगमानत स्नान केले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यानंतर स्नान करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते.

नरेंद्र मोदी हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ त्यांनी केला. त्यानंतर गोरखपूरला त्यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर पंतप्रधान प्रयागराज इथं गेले. त्यांनी संगमावर पवित्र स्नान केलं आणि गंगापूजन करत आरतीही केली.

या आधी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1954 मध्ये कुंभमेळ्यादरम्यान गंगेत स्नान केलं होतं. दिव्य कुंभ, भव्य कुंभ हे यावेळच्या मेळ्याचं घोषवाक्य होतं. दरम्यान यावेळी कुंभ हा सर्व जगाला सांस्कृतिक धाग्यात जोडणारा दुवा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. स्वच्छता आणि व्यवस्थापनाची यावेळी सरकारने अतिशय चांगली व्यवस्था केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi in prayagraj Today