मोदींचा भाऊ म्हणाला त्यांनी 'खरचं' चहा विकला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

एक चहावाला देशाचा पंतप्रधान शकतो. त्यामुळे काहीही शक्य आहे. मी देशाचा प्रधानसेवक म्हणून काम करणार असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले होते. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या चहा विकण्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर अनेकदा टीकाही केली आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चहाच्या मुद्द्यावरून विरोधक टीका करतात. खरंच त्यांनी चहा विकला का? असा प्रश्नही उपस्थित केला जातो. मात्र, नरेंद्र मोदी यांनी खरंच चहा विकला आहे, अशी माहिती मोदींचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी दिली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोमाभाई मोदी म्हणाले, 'गुजरातमधील वडनगर रेल्वे स्टेशनवर वडिलोपार्जित आमचे दोन कँटीन होते. एक स्टेशनवर तर दुसरे स्टेशनच्या बाहेर. चहाच्या कॅंटीनवर नरेंद्र मोदी यांच्यासह आम्ही सुट्टीच्या दिवशी आणि रविवारी येत होतो. त्यावेळी तेथे आम्ही चहा विकण्याचे काम केले आहे. आमच्या वडिलांना मदत म्हणून आम्ही चहा विकण्याचे काम केले. कारण त्यावेळी कँटीनमध्ये नोकर ठेवू शकत नव्हतो. नरेंद्र मोदी यांना चहा विकण्यावरुन विरोधकांना जे काय म्हणायचे आहे ते म्हणू देत. मात्र, त्यांनी स्टेशनवर चहा विकला होता. हे वास्तव आहे.'

दरम्यान, एक चहावाला देशाचा पंतप्रधान शकतो. त्यामुळे काहीही शक्य आहे. मी देशाचा प्रधानसेवक म्हणून काम करणार असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले होते. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या चहा विकण्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर अनेकदा टीकाही केली आहे. मात्र, खरंच नरेंद्र मोदी चहा विकायचे की नाही, याबाबत त्यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी उत्तर दिले आहे.

Web Title: Pm Narendra Modi really sell tea says his brother somabhai modi