#ManVsWild मोदींची जंगल सफारी; ट्विटरवर मोदींचाच डंका

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

या कार्यक्रमाचा निवेदक बेअर ग्रेल्स याने यापूर्वी ट्विट करत मोदी Man Vs Wild मध्ये दिसणार असल्याची माहिती दिली होती. या ट्विटमध्ये त्याने या कार्यक्रमाचा लहान व्हिडिओही शेअर केला होता, ज्यात मोदी व ग्रेल्स यांच्या जंगल सफारीची झलक होती. यात मोदी ग्रेल्सचे स्वागत करीत आहेत.

नवी दिल्ली : डिस्कव्हरी वाहिनीवरचा सर्वांत लोकप्रिय शो 'Man Vs Wild' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते, आज (ता. 12) रात्री 9 वाजता या भागाचे प्रक्षेपण झाले आहे. मोदी या कार्यक्रमात दिसणार असल्याने देशभरात उत्सुकता होती.

मोदींच्या या कार्यक्रमातील सहभागाची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळाली. ट्विटरवर #ManvsWild #PMModionDescovery #DiscoveryChannel हे सर्व ट्रेण्ड पंतप्रधान मोदी आणि या कार्यक्रमासंबधित दिसत होते.

या कार्यक्रमाचा निवेदक बेअर ग्रेल्स याने यापूर्वी ट्विट करत मोदी Man Vs Wild मध्ये दिसणार असल्याची माहिती दिली होती. या ट्विटमध्ये त्याने या कार्यक्रमाचा लहान व्हिडिओही शेअर केला होता, ज्यात मोदी व ग्रेल्स यांच्या जंगल सफारीची झलक होती. यात मोदी ग्रेल्सचे स्वागत करीत आहेत.

बेअर ग्रेल्सने केलेल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, 'या कार्यक्रमाद्वारे 180 देशांमधील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुसरी आणि वेगळी बाजू दिसेल. मोदींनी या शोमध्ये प्राणी संरक्षण व पर्यावर संवर्धनाबाबत संवाद साधला.'

 modi man vs wild

ग्रेल्स व मोदी दोघेही उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्यात फिरत आहेत. मोदी ग्रेल्सशी हासत गप्पा मारत त्याला भारतीय पर्यावरण आणि प्राण्यांबद्दल माहिती देत आहेत, होडीत फिरत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi s man vs wild will be broadcasting today 9 pm