2014 पूर्वी सत्तेत असणाऱ्यांना देशाची प्रगती पाहायची नाही : पंतप्रधान

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

2014 मध्ये सत्ता न मिळाल्याने ते लोक आता सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या लोकांना देशाची प्रगती पाहवत नाही. या अशा लोकांनी संसदेत एक दिवसही काम नाही केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकशाहीची हत्या केली. त्यामुळे मीही आता उपोषण करणार आहे. मात्र, माझे काम मी नेहमी चालू ठेवेन.  

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदार आणि आमदारांना संबोधित करताना सांगितले, की 2014 पूर्वी सत्तेत असणाऱ्यांना देशाची प्रगती पाहायची नाही. ज्या लोकांनी देशाच्या लोकशाहीला नुकसान पोचवले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना ज्या सदस्यांनी संसदेच्या कामात बाधा आणण्याचा प्रयत्न केला अशांचा चेहरा सर्वसामान्य जनतेसमोर उघड करणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी यूपीए सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. 

पंतप्रधान मोदींनी सांगितले, की 2014 मध्ये सत्ता न मिळाल्याने ते लोक आता सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या लोकांना देशाची प्रगती पाहवत नाही. या अशा लोकांनी संसदेत एक दिवसही काम नाही केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकशाहीची हत्या केली. त्यामुळे मीही आता उपोषण करणार आहे. मात्र, माझे काम मी नेहमी चालू ठेवेन.  

यावेळी पंतप्रधान मोदींनी खासदार, आमदार आणि विधानपरिषदेच्या सदस्यांसोबत चर्चा केली. भाजपचे जास्तीत जास्त खासदार, आमदार समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधणार असून, संसदेच्या कामकाजात बाधा आणण्याऱ्यांबद्दल जनतेला सांगणार आहेत. 

Web Title: PM Narendra Modi Said Expose The Few Who Throttled Democracy