12 एप्रिलला भाजपचे खासदार उपोषण करणार : पंतप्रधान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

"संसदेमध्ये विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार येत्या 12 एप्रिलला उपोषण करणार आहेत''. 

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात आले. त्यावर आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "संसदेमध्ये विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार येत्या 12 एप्रिलला उपोषण करणार आहेत''. 

PM MODI

आरक्षणाच्या मुद्यावरून दलितांकडून करण्यात आलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी भाजपचे खासदार आणि इतर नेत्यांना 14 एप्रिल आणि 5 मे या दिवसामध्ये भेट देणार आहेत. यामध्ये हे सर्व 20,844 गावातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या लोकांना सरकारचे विविध उपक्रम आणि योजनांची माहिती देण्यासाठी त्यांच्यासोबत एक रात्र घालवणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना विरोधकांकडून सभागृहात गोंधळ घालण्यात येत होता. त्यामुळे अनेकदा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागत होते. याला विरोध दर्शविण्यासाठी भाजपचे खासदार येत्या 12 एप्रिलला उपोषण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: PM Narendra Modi says BJP MP will fast on April 12 to protest Parliament impasse