विकासाला लोक चळवळीचे स्वरूप : मोदी

पीटीआय
शनिवार, 26 मे 2018

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांत देशाचा विकास हा लोक चळवळीचा भाग बनल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ट्‌विटरद्वारे जनतेशी संवाद साधला. 

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांत देशाचा विकास हा लोक चळवळीचा भाग बनल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ट्‌विटरद्वारे जनतेशी संवाद साधला. 

'चार वर्षांपूर्वी याच दिवशी आपण भारतामध्ये बदल घडवून आणण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. या काळात विकासाला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. भारताच्या विकासामध्ये आपलाही सहभाग असल्याचे लोकांना वाटत आहे. सव्वाशे कोटी भारतीय देशाला नव्या उंचीवर नेत आहेत,' असा दावा मोदी यांनी या वेळी केला. 'साफ नियत, सही विकास' हा हॅशटॅग वापरत मोदींनी भाजप सरकारने साधलेल्या यशाचा पाढा वाचला. याचा पुरावा म्हणून त्यांनी विविध प्रकारचे आलेख, तक्ते आणि व्हिडिओदेखील ट्‌विटरवर प्रसिद्ध केले आहेत. 

भाजप सरकारवर विश्‍वास दाखविल्याबद्दल जनतेचे आभार मानत मोदी यांनी असा पाठिंबा कायम ठेवण्याची विनंती केली. जनतेचे पाठबळ हाच सरकारसाठी ऊर्जेचा स्रोत असल्याचेही ते म्हणाले. आपले सरकार देशाची सेवा समर्पित भावनेने सुरूच ठेवेल, असे आश्‍वासन मोदींनी दिले.

'आमच्या सरकारसाठी नेहमीच देशाला सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. नव्या भारताच्या निर्मितीसाठी सरकारने दूरदृष्टीने अनेक उत्तम निर्णय घेतले आहेत,' असे मोदी म्हणाले. 

मोदी सरकारची ही चार वर्षे अत्यंत निराशाजनक होती. भाजपच्या काही सहकारी पक्षांनी त्यांची सोडलेली साथ हे त्याचेच निदर्शक आहे. केंद्रातील सरकार सर्वच पातळ्यांवर अयशस्वी ठरले आहे. 
- मायावती, अध्यक्षा, बसप 

मोदी सरकारची चार वर्षे म्हणजे राजकारणात भ्रष्टाचार, बॅंक यंत्रणेत अपयश, इंधन दरवाढ, रुपयाचे अवमूल्यन, देशाचा पैसा बाहेर पळवून नेणे, जीएसटीमुळे महागाई वाढ, दलितांवर अत्याचार, बेरोजगारी आणि व्यापाऱ्यांवर अन्याय या गोष्टनिी भरलेली आहेत. 
- अखिलेश यादव, अध्यक्ष, सप

Web Title: PM Narendra Modi says BJP is successfully running government