मोदींच्या राजकीय कुटनीतीला यश

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : जी-20 शिखर परिषदेच्या यजमानासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटनीतीला मोठे यश मिळाले असून, भारतात 2022 मध्ये जी-20 परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष असेल.

या परिषदेचे 2022 मध्ये भारताला यजमानपद मिळण्यासाठी अन्य देशांकडून मदत मिळाली आहे. 2022 मध्ये जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे असणार आहे आणि याच वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 2022 मधल्या जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद हे इटलीला मिळणार होते. परंतु, ते मोदींच्या रणनीतीमुळे भारताला मिळणार आहे.

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, या वर्षी भारत देश स्वांतत्र्याची 75 वर्षे आनंदात साजरी करणार आहे आणि याच वर्षी आपला देश जी-20 शिखर परिषदेचे यजमानपदही भूषवणार आहे. मोदींनी ही गोष्ट अर्जेंटिनामधील आंतरराष्ट्रीय बैठकीदरम्यान सांगितली आहे. मोदी पुढे म्हणाले की, मी इटली आणि इतर देशांना यासंबधी विनंती केली, की भारताला 2021 ऐवजी 2022 या वर्षाचे यजमानपद देण्यात यावे आणि ही मागणी सर्वांनी एकमताने मंजूर करण्यात आली. या सर्व देशांच्या प्रतिनीधींचे मोदींनी आभारही मानले आहेत.

दरम्यान, भारत, चीन आणि रशिया या देशात बारा वर्षांनंतर येथे त्रिपक्षीय चर्चा झाली असून त्यात बहुदेशीय संस्थांमध्ये सुधारणा कार्यक्रम  राबवण्याचे आवाहन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रे, जागतिक व्यापार संघटना या संस्थात सुधारणांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. खुली जागतिक अर्थव्यवस्था व  बहुपक्षीय व्यापार प्रणालीचा फायदा आर्थिक वाढ व भरभराटीसाठी व्हायला हवा असेही या वेळी सांगण्यात आले आहे.

Web Title: pm narendra modi says india to host g 20 summit in 2022