पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात जवान आणि कोरोना; काय आहे संबंध?

narendra-modi.jpg
narendra-modi.jpg

अयोध्या- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काही निवडक लोकांनाच या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले होत.  शिवाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी कोरोनावर यशस्वी मात केलेले जवान तैनात करण्यात आले होते. याबाबतची माहिती उत्तर प्रदेशचे डीआईजी दीपक कुमार यांनी दिली आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी कोरोनावर मात केलेले 150  जवान तैनात करण्यात आले होते. या जवानांमध्ये कोरोना विषाणूविरोधात लढण्याची प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे या जवानांपासून किमान काही महिन्यांपर्यंत तरी कोरोना पसरण्याचा धोका नाही, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. डीआईजी दीपक कुमार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी प्रोटोकॉलनुसार निरोगी जवानांची तैनाती केली जाते. कोरोना योद्ध्यांपेक्षा आणखी कोण सुरक्षित असू शकतं.

पंतप्रधान मोदींचा रामलल्लासमोर 'साष्टांग नमस्कार'; फोटो व्हायरल

पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहोचले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले होते. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम हनुमानगढी मंदिराला भेट दिली. मोदींनी सर्वप्रथम हनुमानाची पूजा केली आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना मुकूट आणि हनुमानाची गदा भेट दिली आहे. त्यानंतर मोदींच्या वाहनाचा ताफा रामलल्लाकडे रवाना झाला. मोदींनी रामलल्लासमोर साष्टांग नमस्कार केला. तसेच रामलल्लाची विधिवत पूजा केली.

जय श्री राम! पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऐतिहासिक भूमीपूजन सोहळा संपन्न!

देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असताना राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वसामान्य लोकांना या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यास बंदी घालण्यात आली होती. निवडक लोकांनाच या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होतो. कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज करोडो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आजचा दिवस सत्य, अहिंसा, श्रद्धा आणि त्यागाचा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com