मोदीजी, 'कोकोनट ज्युस'चे विनोद कपिलच्या शोमध्ये सांगा

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

नवी दिल्ली : टीका-टिपण्णी आणि विनोद करण्यात मोदी पटाईत झाले आहेत. त्यांनी राहुल गांधी यांचे भाषण नीट पाहिले तर त्यांना सत्य कळेल. म्हणजे पुन्हा अशा चमत्कारिक टिपण्णी ते करणार नाहीत, असे काँग्रेसने म्हटले आहे. 
'पंतप्रधान मोदींना खरंच विनोद करण्याची हौस असेल तर कपिल शर्माच्या शोमध्ये एक सहायकाची भूमिका देण्यासाठी मी त्यांची नवजोतसिंग सिद्धू यांच्याकडे शिफारस करतो,' असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. 

नागालँड विधानसभा निवडणुकांसाठी मंगळवारी (28 फेब्रुवारी) पूर्व इम्फाळ येथे राहुल गांधी यांची सभा झाली. त्यावेळी राहुल जे बोलले नाहीत, ते विधान त्यांच्या नावे सांगून त्यांच्यावर टीका करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनीही त्याची खातरजमा न करता त्यांच्यावर जोरदार टीका केली. 

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले...
राहुल गांधी मणिपुरी मतदारांना उद्देशून म्हणाले होते की, "तुम्ही येथे लिंबू, नारिंगी, अननस पिकवता. मला आशा आहे की एक दिवस असा येईल की लंडनमध्ये कुणीतरी अननसाचा ज्युस पिताना त्या खोक्यावर बघेल आणि त्याला 'मेड इन मणिपूर' असे दिसेल." 

आणि मोदी काय म्हणाले...
त्यावर महाराजगंज येथील एका सभेत बोलताना राहुल यांची खिल्ली उडवत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "काल राहुल यांनी एक मोठी घोषणा केली. ते आता नारळातून ज्युस काढणार आहेत म्हणे. आणि ते ज्युस इंग्लंडमध्ये विकणार आहेत. गरिबातील गरीब मुलालाही माहीत आहे की नारळातून पाणी मिळते. ज्युस लिंबू, संत्रे, मोसंबीतून मिळतो. नारळाचा ज्युस कधी ऐकला आहे का? कदाचित मला माहीत नसेल तर सांगा. नारळ केरळात मिळतात, पण हे येथे म्हणताहेत की नारळाचा ज्युस काढेन."
 
Web Title: pm narendra modi should join kapil sharma show

व्हिडीओ गॅलरी