लोकांना मूर्ख समजणे मोदींनी आता सोडावे: प्रियांका गांधी

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi

मिर्झापूर : लोक मूर्ख आहेत, हा विचार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडावा. लोकांना प्रत्येक गोष्ट चांगली कळते, असा जोरदार टोला कॉंग्रेसच्या नेत्या आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी (ता. 20) आपल्या गंगा यात्रेदरम्यान लगावला. मोदींनी आपल्या कुटुंबाचा कितीही छळ केला, तरी अजिबात घाबरणार नाही, असा कणखर इशाराही त्यांनी दिला. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्व उत्तर प्रदेशासाठी पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या प्रियांका गांधी यांनी तीन दिवसांपासून मोदींच्या मतदारसंघात गंगा जलयात्रा सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात 11 एप्रिलला होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी गंगानदीच्या किनाऱ्यावरील मतदारसंघात जोरदार प्रचारमोहीम सुरू केली आहे. मोदींवर आज प्रहार करताना त्या म्हणाल्या, ""पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक संस्थेवर टीका केली. ते ज्या संस्थेचे घटक आहेत, त्यावरही त्यांनी टीका केली. लोक मूर्ख असतात, हा विचार करणे आता तरी पंतप्रधानांनी सोडावे. लोक जे पाहतात, ते त्यांना चांगलेच कळते. मोदींनी छळ केला तरी आपण त्याला अजिबात घाबरणार नाही. त्यांनी काहीही केले आणि आम्हाला त्रास दिला, छळ केला तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही त्याविरुद्ध लढा देऊच. आमचा कितीही छळ केला तरी आमची लढाई तितकीच प्रखर होईल.''

मिर्झापूरमध्ये मंदिराच्या प्रांगणात नागरिकांशी संवाद साधताना देशाच्या विकासासाठी मोदींनी पाच वर्षांत काहीही केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारने लोकांना केवळ आश्‍वासने दिली. राजकारण हे विकासासाठी करायचे असते. या सरकारने रोजगारनिर्मितीसाठी काय केले? कॉंग्रेसने त्यांच्या काळात व्यापक रोजगारनिर्मिती केली. कॉंग्रेसच्या काळात मनरेगा ही सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणारी योजना देशाला भेट देण्यात आली. पण भाजप सरकारच्या काळात या योजनेत मजुरांऐवजी यंत्राचा वापर करण्यात आला. कॉंग्रेस परत सत्तेवर आल्यास ते शेतकरी आणि गरिबांच्या कल्याणासाठीच काम करेल, असा दावा त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com