भारतातील एकता नेहमी राज्यसभेत दिसून येते : मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

नवी दिल्ली : 'राज्यसभेचे 250वे सत्र ही एक विचारयात्रा आहे. भारतातील एकता ही नेहमीच राज्यसभेत दिसून येते. कतृत्ववान नेत्यांनी आतापर्यंत राज्यसभेचे नेतृत्व केले, त्यासाठी त्यांचे अभिनंदन!' असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या 250व्या सत्रानिमित्त बोलताना काढले.  

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'राज्यसभा ही देशाची विकासयात्रा आहे. भारताच्या राज्यसभेचे स्थायीभाव आणि विविधता हे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. राज्यसभेने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. लोकसभा जमिनीशी जोडली गेली आहे, तर राज्यसभेची दूरदृष्टी पाहणे हे काम आहे. तसेच या राज्यसभेने अनेक ऐतिहासिक निर्णय पाहिले आहेत. अनेक कतृत्त्ववान नेत्यांनी या राज्यसभेचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेला राज्यसभेचा प्रवास प्रेरणादायी आहे, या राज्यसभेचा कधीच भंग होणार नाहीअसेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

खासदार नुसरत जहाँ रुग्णालयात दाखल, कारण...

भारत राज्यसभेच्या माध्यमातून नवनव्या विचारांचे प्रतिनिधित्व करत आहे. राज्यसभेच्या प्रवासात सहभागी होता आले हे माझे भाग्य आहे, असे मोदींनी यावेळी सांगितले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. यावेळी मोदी राज्यसभेत भाषण करत होते.  

पर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi speaks at Rajyasabha