esakal | Video:दहशतवाद हे जगापुढील आव्हान; मोदींचे संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषण
sakal

बोलून बातमी शोधा

pm narendra modi

संयुक्त राष्ट्र (अमेरिका): सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले. भारतातील स्वच्छता मोहिमाचे संदर्भ देत, भारताने संपूर्ण जगाला स्वच्छचेता संदेश दिल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. तसेच दहशतवाद हा जगासमोरचा प्रश्न असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Video:दहशतवाद हे जगापुढील आव्हान; मोदींचे संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषण

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

संयुक्त राष्ट्र (अमेरिका): सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले. भारतातील स्वच्छता मोहिमाचे संदर्भ देत, भारताने संपूर्ण जगाला स्वच्छचेता संदेश दिल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. तसेच दहशतवाद हा जगासमोरचा प्रश्न असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

महात्मा गांधीच्या उल्लेखाने सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या उल्लेखाने केली. यावर्षी आदरणीय महात्मा गांधी यांची १५०वी जयंती आहे. जगभरात त्यांची जयंती साजरी केली जात आहे. सत्य आणि अहिंसेचा त्यांचा संदेश आजही जगाच्या शांती, प्रगतीसाठी प्रासंगिक आहे. त्यांच्या १५०व्या जयंती वर्षात मला, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलण्याची संधी मिळत आहे, हे मी माझे भाग्य समजतो, अशी पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात केली.

काय म्हणाले मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीने बहुमताने मला निवडून दिले आहे. त्यामुळेच मी आज येथे उभा आहे. येथे येताना, मी संयुक्त राष्ट्रातील कार्यालयाचे निरीक्षण करत होतो. येथे कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक वापरले जात नसल्याचे कळाले. आम्हीदेखील भारतात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बंदीची मोहीम राबवत आहोत. भारतात खूप मोठी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबवली जात आहे. गेल्या पाच वर्षांत भारतात आम्ही ११ कोटी शौचालये बांधली आहेत. अशाप्रकारच्या कामातून आम्ही संपूर्ण जगाला संदेश दिला आहे. दहशतवाद हे केवळ भारतापुढील नाही तर जगापुढील आव्हान आहे.’

loading image
go to top