'मोदींकडून जातीयतेचे विष पेरून समाजात फूट पाडण्याचे काम'

वृत्तसंस्था
रविवार, 15 जुलै 2018

गेल्या आठवड्यात काही मुस्लिम विचारवंताची राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राहुल यांनी काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष असल्याचे म्हटले होते असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हे वृत्तही खोडसाळ असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. या देशाची लोकसंख्या शंभर कोटी तीस लाखाच्या घरात असेल तर केवळ एकाच धर्माचे लोक एकाच पक्षात कसे असू शकतात. काँग्रेस सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. तो केवळ हिंदुचा, मुस्लिमांचा किंवा ख्रिश्‍चनांचा असूच शकत नाही. तर सर्वांचा असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयतेचे विष पेरून समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस हा केवळ मुस्लिमांच्या पाठिंब्यावर उभा असल्याची टीका मोदी यांनी केली होती. त्याचा समाचार काँग्रेसने घेतला. 

उत्तर प्रदेशातील एका जाहीरसभेत बोलताना मोदी म्हणाले, की काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे. त्याबद्दल गेल्या दोन दिवसापासून चर्चाही सुरू असल्याचे मी एका दैनिकात वाचले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हेही म्हणत की देशातील साधनसंपत्त्तीवर येथील मुस्लिमांचाही अधिकार आहे. याचा अर्थ असा होतो काँग्रेस केवळ मुस्लिमांच्या पाठिंब्यावर उभा आहे. 

मोदींनी केलेल्या या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते प्रमोद तिवारी म्हणाले, की मोदी हे समाजात विष पेरण्याचे काम करीत आहेत. काँग्रेस हा असा पक्ष आहे की तो सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणार आहे. ही परंपरा पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यापासून सुरू आहे. केवळ मुस्लिमांचा काँग्रेस पक्ष आहे असे कसे म्हणता येईल. 

माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीही मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की मोदी यांना तिहेरी तलाक काय आहे हे माहीत आहे का? त्यांनी ट्रिपल तलाकविषयी जाहीरपणे माहिती द्यावे तसे झाल्यास आम्हाला आनंदच होईल. पण, तसे होणार नाही. कारण त्यांना ज्या गोष्टी माहीत नाहीत त्यावर ते बोलूच शकणार नाहीत. 

गेल्या आठवड्यात काही मुस्लिम विचारवंताची राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राहुल यांनी काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष असल्याचे म्हटले होते असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हे वृत्तही खोडसाळ असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. या देशाची लोकसंख्या शंभर कोटी तीस लाखाच्या घरात असेल तर केवळ एकाच धर्माचे लोक एकाच पक्षात कसे असू शकतात. काँग्रेस सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. तो केवळ हिंदुचा, मुस्लिमांचा किंवा ख्रिश्‍चनांचा असूच शकत नाही. तर सर्वांचा असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.  

Web Title: PM Narendra Modi spreading poison of division says Congress