ModiWithAkshay : मोदी रिटायरमेंटनंतर काय करणार?, वाचा सविस्तर

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 एप्रिल 2019

अवघ्या तीन तासांची झोप पुरते का? 
शरीराला कमीत कमी सात तासांची झोप आवश्‍यक असते. मात्र, तुम्ही फक्त तीन-चार तास झोपता, अशी विचारणा अक्षयकुमारने केल्यानंतर मोदी म्हणाले की, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे जेव्हा मला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनीही मला हाच प्रश्न विचारला होता. त्यानंतरही प्रत्येक भेटीत ओबामांचा प्रश्न असतो की, तुम्ही झोपेचा कालावधी वाढविला की नाही?

नवी दिल्ली : मला काही येत नाही, जी जबाबदारी मिळाली तेच मी आयुष्य मानले आहे. मला वाटत नाही, मला व्यस्त ठेवण्यासाठी काही करावे लागेल. माझे आयुष्य कोणत्यातरी मिशनमध्येच जाईल, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील निवृत्तीनंतर काय करणार असे विचारले असता दिले.

राजकीय संन्यासानंतर काय करणार याबाबत विचारले असता मोदी म्हणाले, की अटलजी, अडवानीजी, प्रमोद महाजनजी, माझी अशी सर्वांची निवृत्तीबाबत चर्चा सुरु होती. त्यावेळी मला विचारल्यानंतर मी सांगितले की याबाबत विचार केलेला नाही. काही विशिष्ट पार्श्‍वभूमीच्या व्यक्तींनाच पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडत असतात. अशी कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे आपण देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोचू, असा विचारही मी कधी केला नव्हता, अशी कबुली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षयकुमार याने घेतलेल्या मुलाखतीमध्ये दिली. पंतप्रधानपदापर्यंतचा आपला प्रवास हा अविश्वसनीय होता, असेही मोदी यांनी नमूद केले. 

अक्षयकुमार याने घेतलेली मोदींची मुलाखत बुधवारी प्रसारित करण्यात आली. ही मुलाखत अराजकीय स्वरूपाची असल्याचा दावा करण्यात आला असून, या मुलाखतीत मोदींनी विविध विषयांवर आपली दिलखुलास मते मांडली आहेत. 

अवघ्या तीन तासांची झोप पुरते का? 
शरीराला कमीत कमी सात तासांची झोप आवश्‍यक असते. मात्र, तुम्ही फक्त तीन-चार तास झोपता, अशी विचारणा अक्षयकुमारने केल्यानंतर मोदी म्हणाले की, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे जेव्हा मला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनीही मला हाच प्रश्न विचारला होता. त्यानंतरही प्रत्येक भेटीत ओबामांचा प्रश्न असतो की, तुम्ही झोपेचा कालावधी वाढविला की नाही?

Web Title: PM Narendra Modi talked about after political retirement with Akshay Kumar interview