कर्तारपूर कॉरिडॉरबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले इमरान खान यांचे आभार

टीम ई-सकाळ
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

गुरुदासपूर (पंजाब) : पंजाबमधील डेरा बाबा नानक ते पाकिस्तानातील कर्तारपूर या मार्गावरील कर्तारपूर कॉरिडॉरचे आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद् घाटन झाले. गुरुनानक देवी जी यांच्या 550व्या जन्म जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा कॉरिडॉर सुरू करण्यात आलाय. या वेळी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह केंद्रीय मंत्री हरसिमनत कौर, खासदार सनी देओल आणि इतर नेते मंडळी उपस्थित होते.

आता तरी रामाच्या नावावरचं राजकारण थांबेल

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली. त्या वेळी डॉ. सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौरदेखील उपस्थित होत्या. 

न्यायालयात अवतरला रामाचा 'नेक्स्ट फ्रेंड'

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'गुरुनानक देवी जी यांनी आपल्या आयुष्यात  प्रचंड आनंद दिला आहे. या कॉरिडॉरच्या पुर्ततेसाठी पाकिस्तानने केलेले सहकार्य स्वागतार्ह आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतीयांच्या भावनांचा आदर केला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.' दरम्यान, उद् घाटन सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत लंगरमध्येच भोजन घेतले. त्या वेळी पंजाबच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर उपस्थित होत्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi thanks pakistan pm imran khan for kartarpur corridor gurdaspur punjab