हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले! काय म्हणाले पाहा

टीम ई-सकाळ
सोमवार, 16 डिसेंबर 2019

नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाले आहे. लोकप्रतिनिधींनी त्या विधेयकाला मंजुरीसाठी पाठिंबा दिला आहे. हिंसाचारासारख्या घटनांमुळं भारताच्या पारंपरिक बंधुत्व, सद् भाव, करुणा या संस्कृतीला तडा जातो. : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यामुळं देशभरात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेवर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय. पंतप्रधान मोदींनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले नरेंद्र मोदी? 
हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाले आहे. लोकप्रतिनिधींनी त्या विधेयकाला मंजुरीसाठी पाठिंबा दिला आहे. हिंसाचारासारख्या घटनांमुळं भारताच्या पारंपरिक बंधुत्व, सद् भाव, करुणा या संस्कृतीला तडा जातो. मी तमाम भारतीयांना, ही ग्वाही देतो नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळं भारतातील कोणत्याही धर्माच्या नागरिकत्वावर परिणाम होणार नाही. भारतीयांना या कायद्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. ज्यांच्यावर वर्षानुवर्षे अन्याय झाला आहे आणि त्यांना भारतात वास्तव्य करण्याशिवाय पर्याय नाही, अशांसाठी हा कायदा आहे. हे वेळ आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची आहे. प्रत्येक भारतीयला विशेषतः गरिबांना आणि उपेक्षितांना सक्षम करून भारताच्या विकासाला हात भार लावण्याची वेळ आहे. आपल्याला कोणी हेतुपरस्सर वेगळं करण्याचा प्रयत्न करत असले तर, ते कदापी सहन केलं जाणार नाही. हे वेळ शांतता राखण्याची आपली एकत्मता राखण्याची आणि बंधुभाव टिकवण्याची आहे. माझं सगळ्यांना आवाहन आहे की, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या अफवेपासून दूर रहा.

वाचा ब्लॉग - राहुल-सावरकर-रेप इन इंडिया काय आहे त्यामागचे वास्तव?

आणखी वाचा - दिल्लीनंतर लखनौतही आंदोलन भडकले

देशभरात हिंसक आंदोलन
नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात सुरुवातीला ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसाचार उसळला. त्यानंतर त्याचे लोण देशभरात पसरले. पश्चिम बंगाल, नवी दिल्ली आणि आता उत्तर प्रदेश, मुंबईतही कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. काल दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर दिल्ली ट्रान्सपोर्टच्या बसेस पेटवून देण्यात आल्या. तर, आज नदवा कॉलेजच्या बाहेरही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. कोलकात्यात स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pm narendra modi twitter after violence incidents against caa