HappyBirthdayPM : मोदींकडे आहे 'हा' मोबाईल आणि 'या' कंपनीचे सीमकार्ड

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : सोशल मीडियाशी कायम कनेक्ट असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर) 69 वा वाढदिवस असून, मोदींच्या दैनंदिन जिवनाबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यात नागरिकांना रस आहे. विशेष म्हणजे ते वापरत असलेल्या मोबाईल आणि सीमकार्डबद्दल. 

ट्विटर आणि फेसबुकवर सतत अपडेट राहणारे मोदी हे ऍपल कंपनीचा आयफोन वापरतात हे स्पष्ट आहे. मोदी 2018 मध्ये चीन आणि दुबईच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान आयफोन6 मधून फोटो काढताना दिसले होते. सुरक्षेच्या कारणांमुळे नरेंद्र मोदी फक्त टॉप-अँड ऍपल डिव्हायसेसचा वापर करतात.

तसेच मोदींनी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मोबाईलचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. या स्क्रिनशॉटमध्ये व्होडाफोन कंपनीचे नेटवर्क दिसत होते. त्यामुळे ते व्होडाफोन कंपनीचे सीमकार्ड वापरत असल्याचे स्पष्ट आहे. मोदींबरोबरच भाजपचे अनेक नेते ऍपल कंपनीचा स्मार्टफोन वापरतात. यात गृहमंत्री अमित शहा यांचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com