पंतप्रधान नरेंद्र मोदी आईसमोर नतमस्तक

Narendra Modi
Narendra Modi

अहमदाबाद : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. जबाबदारीने कार्य करत जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून देशवासीयांच्या स्वप्नातील भारत निर्माण करू,'' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जनतेशी बोलताना व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमध्ये भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जनतेशी संवाद साधला. सुरतमध्ये घडलेल्या अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पित केली. गुजरातच्या जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी नेहमीच खास असतो, अशा शब्दांत त्यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले. लोकसभेच्या गुजरातमधील सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी मोदींचे स्वागत केले. त्यानंतर मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अहमदाबादच्या कार्यालयाला भेट देत जनतेशी संवाद साधला. सभेनंतर त्यांनी घरी जाऊन आईचे आशीर्वादही घेतले. यावेळी नागरिकांनी 'मोदी, मोदी'च्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले.  

"सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा मला विश्वास होता. हे मी सांगितले त्या वेळी माझी खिल्ली उडवली होती; पण देशवासीयांनी मला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. लोकांनी ठरवले होते की पुन्हा एकदा मजबूत सरकार द्यायचे आहे. म्हणूनच पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली. गुजरातच्या जनतेने मला खूप प्रेम दिले आहे. ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. 2014 मध्ये देशाला गुजरातच्या विकासाचे मॉडेल समजले. गुजरातमधून दिल्लीच्या दरबारात गेलो असलो तरी तुम्ही दिलेले संस्कार विसरलेलो नाही. माझ्या प्रिय धरतीसमोर मी नतमस्तक होतो. येथील लोकांनी मला शिकवले, संस्कार शिक्षण दिले, तेच आज कामी येत आहेत,'' असे मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com