मोदींनी लाईव्ह पाहिले चांद्रयान2 चे उड्डाण; भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जुलै 2019

याविषयी मोदींनी ट्विट करत चांद्रयान 2चे प्रक्षेपण लाईव्ह बघत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. मोदी म्हणाले, की हे विशेष क्षण ऐतिहासिक असून, आपल्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान 2 चे यशस्वी उड्डाण केले आहे. आज प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असेल.

नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान 2 चे लाईव्ह प्रक्षेपण पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहत असल्याचे छायाचित्रे त्यांनी ट्विट केली असून, त्यांनी या यशस्वी प्रक्षेपणानंतर प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मागील आठवड्यात स्थगित करण्यात आलेल्या 'चांद्रयान- 2' आज (सोमवारी) दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी अवकाशात यशस्वीरित्या झेपावले. चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने भारताचे चांद्रयान-2 काम करणार आहे. तब्बल 45 दिवस प्रवास केल्यानंतर 'जीएसएलव्ही मार्क- 3' हा प्रक्षेपक 'चांद्रयान- 2'ला चंद्राच्या कक्षेत पोचविणार आहे. अखेरच्या 15 मिनिटांमध्ये 'चांद्रयान- 2' हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर घिरट्या घालणार आहे. या मोहिमेद्वारे चंद्राच्या आतापर्यंत संशोधन न झालेल्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवून अभ्यास केला जाणार आहे. 

याविषयी मोदींनी ट्विट करत चांद्रयान 2चे प्रक्षेपण लाईव्ह बघत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. मोदी म्हणाले, की हे विशेष क्षण ऐतिहासिक असून, आपल्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान 2 चे यशस्वी उड्डाण केले आहे. आज प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi watch live chandrayaan 2 launching