#PMModionDiscovery : मोदी दिसणार 'ManvsWild'मध्ये!

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

बेअर ग्रेल्सने मोदींच्या शोच्या व्हिडिओचा काही भाग ट्विट केला आहे. यात मोदी ग्रेल्सचे स्वागत करत आहेत. दोघेही उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्यात फिरत आहेत.

डिस्कव्हरी वाहिनीवरचा सर्वात लोकप्रिय शो Man Vs Wild मध्ये आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार आहेत. Man Vs Wild च्या या भागात मोदींसोबत लोकप्रिय निवेदक बेअर ग्रेल्सही दिसेल. 12 ऑगस्टला रात्री 9 वाजता हा भाग दाखवला जाईल.

बेअर ग्रेल्सने मोदींच्या शोच्या व्हिडिओचा काही भाग ट्विट केला आहे. यात मोदी ग्रेल्सचे स्वागत करत आहेत. दोघेही उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्यात फिरत आहेत. '180 देशांमधील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुसरी आणि वेगळी बाजू दिसेल. मोदी या शोमध्ये प्राणी संरक्षण व पर्यावर संवर्धनाबाबत संवाद साधतील,' असे ट्विट त्याने केले आहे.

मोदी ग्रेल्सशी हासत गप्पा मारत त्याला भारतीय पर्यावरण आणि प्राण्यांबद्दल माहिती देत आहेत, होडीत फिरत आहेत. हा शो बघण्यासाठी सारा देश उत्सुक आहे.      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi will participate in Man vs Wild show on Discovery