नरेंद्र मोदी "पर्सन ऑफ दी इयर'

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

न्यूयॉर्क : जगभरातील मोदी भक्तांसाठी आणखी एक खुशखबर "टाइम' मासिकाने दिली आहे. टाइम मासिकाच्या ऑनलाईन सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी "पर्सन ऑफ द इयर' ठरले आहेत. या ऑनलाईन सर्वेक्षणात मोदी यांच्याबरोबर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विकिलिक्‍सचे संस्थापक ज्युलिअन असांजे या व्यक्तींची नावे स्पर्धेत होती. या तिघांनाही प्रत्येकी सात टक्के मते मिळाली. तर मार्क झुकेरबर्गला दोन आणि हिलरी क्‍लिंटन यांना चार टक्के मते मिळाली.

टाइम मासिकाच्या यंदाच्या "पर्सन ऑफ द इयर' यादीत दुसऱ्यांदा स्थान मिळविण्याचा मान पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला आहे. प्रभावशाली व्यक्तीची ही यादी टाइम मासिकाने सोमवारी जाहीर केली. "पर्सन ऑफ द इयर' निवडण्यासाठी टाइमने याचे ऑनलाईन सर्वेक्षण घेतले. या सर्वेक्षणात ऑनलाईन वाचकांनी "नरेंद्र मोदी' यांना "पर्सन ऑफ द इयर' म्हणून पसंती दिली. टाइम मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांना एकुण 18टक्के मते मिळाली. टाइम मासिकाकडून "पर्सन ऑफ द इयर'चा विजेता सात डिसेंबरला जाहीर होईल.

देशातील भ्रष्टाचार, काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी चलनात बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने मोदींचा प्रभावही सध्या वाढत आहे. अमेरिकेच्या निवडणुकी दरम्यान विकिलीक्‍सने गोपनीय कागदपत्रांचा खुलासा केल्याने ज्युलियन असांजेलाही लोकप्रियता मिळाली.
नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा "पर्सन ऑफ द इयर'चा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी 2014मध्ये मोदींनी 16 टक्के मते मिळवत या यादीत स्थान पटकविले होते. याशिवाय, मोदी सलग चार वर्षे या पुरस्काराच्या स्पर्धेत आहेत. टाइम मासिकाकडून दरवर्षी जगातील परिस्थितीवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांना गेल्या वर्षी हा पुरस्कार मिळाला होता.

Web Title: PM Narendra Modi wins online readers' poll for TIME Person of the Year