मोदींनी दिल्या महापर्व छटपूजेच्या शुभेच्छा!

वृत्तसंस्था
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

उत्तर भारतात उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे छटपूजा! आज देशभरात उत्साहात छटपूजा साजरी केली जात आहे. या छटपूजेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली : उत्तर भारतात उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे छटपूजा! आज देशभरात उत्साहात छटपूजा साजरी केली जात आहे. या छटपूजेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

'महापर्व छठ पूजेनिमित्त सर्व देशवासियांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. सूर्य देव आपल्यावर उर्जेचा वर्षाव करत आहे. यामुळे आपला देश सुख-समृद्धीच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहे.' अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिल्या आहेत. 

छटपूजा का साजरी केली जाते?

दिवाळीनंतर येणाऱ्या षष्ठीला म्हणजचे सहाव्या दिवशी ही छटपूजा केली जाते. या दिवशी सूर्याची मनोभावे पूजा केली जाते. घरातील महिला तीन दिवसांचा उपवास करतात व शेवटच्या दिवशी नदी, तलाव, समुद्र अशा पाण्याच्या ठिकाणी जाऊन उगवत्या व मावळत्या सूर्याची पूजा करतात. शेतातील नवीन पीक, धान्य, ऊस यांचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो व सूर्याची पूजा केली जाते. तसेच सूर्यदेवाला अर्घ्य वाहून नमस्कार केला जातो. 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi wishes ChathPuja on twitter