पंतप्रधान मोदींनी दिल्या सोनिया गांधींना शुभेच्छा

वृत्तसंस्था
रविवार, 9 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (रविवार) 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.

सोनिया गांधी या अनेक वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून शुभेच्छा देताना म्हटले आहे, की श्रीमती सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. त्यांना दिर्घायुष्यासाठी माझ्याकडून प्रार्थना. 

सोनिया गांधी यांचा इटलीतील ल्युसियाना येथे 1946 मध्ये जन्म झाला होता. राजीव गांधी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या भारताच्या नागरिक बनल्या. सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. द्रमुकच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: PM narendra modi wishes sonia gandhi on her birthday