मोदींचे धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम : राहुल गांधी

PM Narendra Modi work to create rift says Rahul Gandhi
PM Narendra Modi work to create rift says Rahul Gandhi

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व लोकांना तोडायचे आहे. मी पंतप्रधान होण्याआधी देश झोपला होता, असे म्हणत त्यांनी देशवासियांचा अपमान केला आहे. नरेंद्र मोदींना जातीपातीत भांडण लावायचे आहे. त्यांना जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करायचे आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राममधील जाहीर सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह कॉंग्रेस कार्यसमितीचे सुमारे 50 सदस्य हजर होते.

राहुल गांधी म्हणाले, अनिल अंबानी यांनी संपूर्ण आयुष्यात एकाही विमानाची निर्मिती केली नाही. एचएएल इतकी वर्ष विमान निर्मिती करत आहे. मात्र, त्यांच्याकडून काढून घेत अनिल अंबानींना करार देण्यात आला. 30 हजार कोटी रुपये त्यांच्या खिशात घालण्यात आले. अनिल अंबानींवर 33 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com