पुरातन, पुनीत, परिमल काशी मोदी यांनी लिहिली कविता

पुरातन, पुनीत, परिमल काशी मोदी यांनी लिहिली कविता

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या मतदारांना व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला आहे. त्यात त्यांनी मोदी यांनी काशीसाठी लिहिलेल्या आपल्याच एका कवितेचा उल्लेख केला. ते म्हणाले, जेव्हा मी काशीबाबत लिहिण्यासाठी पेन हातात घेतले, तेव्हा जास्त काही लिहू शकलो नाही, फक्त एवढेच लिहू शकलो... पुरातन, पुनीत, परिमल काशी अडिग, अप्रतिम, अविरल काशी, निरंतर निर्विघ्न निर्मल काशी, विशिष्ट, विकसित, विमल काशी' 

मागील पाच वर्षांत वाराणसीमध्ये झालेली प्रगती आणि विविध विकास योजनांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणून वाराणसीमधून मिळालेला अनुभव महत्त्वपूर्ण होता, असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मागील पाच वर्षांत विकासाची गती वाढली आहे. विविध योजनांचा सर्व वर्गाला फायदा मिळाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. ""वाराणसीचा फक्त विकास होत नाही तर आध्यात्मिक प्रगतीही होत आहे. जगातील विविध राष्ट्रांचे प्रमुखही वाराणसीतील आध्यात्मिकतेचे कौतुक करतात. मागील पाच वर्षांत आम्ही काशीसाठी खूप काही केले आहे. आणखी भरपूर करायचे आहे. आता थांबायचे नाही. आणखी पुढे जायचे आहे,'' असे त्यांनी सांगितले. 

"गेल्यावेळी जेव्हा मी उमेदवारी अर्ज भरायला आलो होतो. त्या वेळी तुम्ही "रोड शो'दरम्यान येथे येऊ नका, असे म्हटले होते. आता प्रत्येक काशीवासी नरेंद्र मोदी होऊन निवडणूक लढतही आहे आणि लढवतही आहे. काय करायचे आहे आणि काय करायचे नाही, हे प्रत्येक काशीवासीय जाणून आहे,'' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

"मतदानास अवश्‍य जा' 
"मी तुम्हाला फक्त एवढे सांगू इच्छितो की, 2019 मध्ये तुम्ही लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवात सहभागी होत आहात. मतदानास अवश्‍य जा, मतदानासाठी सर्वांना प्रोत्साहन द्या', असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com