esakal | Independence Day : आम्ही समस्या पाळतही नाही आणि टाळतही नाही : मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

Independence Day : आम्ही समस्या पाळतही नाही आणि टाळतही नाही : मोदी

जम्मू-काश्मीर लडाखचा नागरिकांना न्याय देणारे कलम 370 या सरकारने 70 दिवसात रद्द केले. पण ते आज या कलमाची वकिली करत आहेत त्यांनी स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ हे कलम स्वरूपी न करता अधांतरी लटकत का ठेवले असा तिखट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कांग्रेसला विचारला.

Independence Day : आम्ही समस्या पाळतही नाही आणि टाळतही नाही : मोदी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर लडाखचा नागरिकांना न्याय देणारे कलम 370 या सरकारने 70 दिवसात रद्द केले. पण ते आज या कलमाची वकिली करत आहेत त्यांनी स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ हे कलम स्वरूपी न करता अधांतरी लटकत का ठेवले असा तिखट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कांग्रेसला विचारला
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या प्राचीवरून बोलताना पंतप्रधानांनी साडेतीन लाख कोटी गुंतवणूक असलेले जल जीवन मिशन तीनही सैन्यदलांचा साठी सीडीएस हे एकच वरिष्ठ पद निर्माण करणे, मेड इन इंडिया उत्पादने प्राधान्याने वापरणे रस्त्यांसह पायाभूत सुविधांसाठी 100 कोटी रुपये गुंतवणुकीची योजना अशा अनेक घोषणा पंतप्रधानांनी आज केल्या.

विदेशात सुटीसाठी म्हणुन फिरायला जाणारांनी ईशान्य भारतासह देशातल्याच पर्यटन स्थळांची निवड करावी असे आवाहन करतानाच शेतीत रासायनिक खतांचा वापर बंद करणे आणि प्लास्टिक मुक्तीचा संकल्पही त्यांनी देशवासीयांना दिला.

सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर आल्यावर स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर रोखठोक मतप्रदर्शन केले. आम्ही समस्या पाळत नाही आणि टाळतही नाही असा टोला काँग्रेसला लगावून पंतप्रधान म्हणाले की 70 वर्षांपासून रखडत ठेवण्यात आलेली काश्मीर समस्या आम्ही सत्तेवर येताच तर 70 दिवसात सोडवली आणि कलम 370 आणि 35 अ रद्द करून वल्लभभाई पटेल यांचे एक स्वप्न पूर्ण केले. या कलमाची आता वकिली करताना तुम्ही ते अधांतरी लोंबकळत का ठेवले, कलम 370 इतके महत्त्वाचे आणि अनिवार्य होते तर ते घटनेत कायमस्वरूपी का केले नाही असे सवाल त्यांनी काँग्रेसला विचारले.

पंतप्रधानांनी आजच्या भाषणात घराघरात 2022 पर्यंत शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी जल जीवन योजनेची घोषणा केली तमिळ संत तिरुवल्लूर आणि गुजरातमधील जैन संत बुद्धीसागर महाराज यांनी शेकडो वर्षांपूर्वीच पाण्याचे महत्व ओळखले होते अशी उदाहरणे त्यांनी दिली.

लोकसंख्या वाढ रोखणे ही काळाची गरज असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी कारण एकविसाव्या शतकातला भारत साकारणे रोगग्रस्त आणि अशिक्षित समाजाच्या कुवतीचे नाही असेही त्यांनी सांगितले पंतप्रधान म्हणाले की भ्रष्टाचार आणि घराणेशाही ने देशाचे कल्पना करता येणार नाही इतके नुकसान केले या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी माझ्या सरकारने सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपातील अनेक सरकारी अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली मात्र हा रोग समूळ करण्यासाठी प्रत्येक देशवासीयांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.

सामान्य लोकांच्या जीवनात पावलावर सरकारची लुडबुड ही बंद व्हायला हवी हे सांगताना इस ऑफ लिविंग इच्छापूर्तीसाठी माझे सरकार आता प्रयत्न करेल असे सांगितले. त्यांनी इज ऑफ दोईंग बिझनेस सारख्या योजनांचा दाखला दिला त्याचबरोबर मागच्या पाच वर्षात 150 कायदे त्यात सहा जे होते ते माझ्या सरकारने रद्द केले.

मराठी अर्थव्यवस्था पाच पाच लाख कोटी डॉलर स्वप्न अनेकांना अशक्य वाटते माझ्या सरकारने 2014 ते 19 या काळात एक लाख कोटी वाढीसाठी टप्पा पार केला आणि त्याआधीच्या सत्तर वर्षात आपली अर्थव्यवस्था दोन लाख कोटींवर होती त्यांनी सांगितलं देशातील राजकीय स्थिरता आणि सरकारची दृढ इच्छाशक्ती तसेच महागाई नियंत्रित करताना विकासदर चढता ठेवणे हा समतोल माझ्या सरकारने साजरा आहे असा दावा त्यांनी केला भारतीय कंपन्यांना जागतिक पातळीवर पंख पसरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा वीर झाड करतानाच पंतप्रधानांनी संपत्ती निर्माण करणारा वर्ग उद्योजक उद्योगपती यांच्याकडे हिंद भावनेने पाहणे समाजाने बंद करावे असे खणखणीतपणे सांगितले.

महात्मा गांधींची दीडशेवी जयंती ही हागणदारी मुक्त झाल्याच्या घोषणेने असा विश्वास व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी येत्या 2 ऑक्‍टोबरला प्रत्येक देशवासीयांनी प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करावा असे आवाहन केले सिंगल युज प्लास्टिक हा यातला पहिला टप्पा आहे असे सांगून त्यांनी फेरवापर असे शोध शास्त्रज्ञ आणि उद्योजकांनी लावावेत असे आवाहन केले दिवाळी आणि नववर्षाला कॅलेंडरे आणि डायलॉग भेट देण्याऐवजी प्लास्टिकच्या पिशव्या भेट द्या असेही साकडे त्यांनी देशवासियांना घातले. शेतकऱ्यांनी खाते बंद करून जास्तीत जास्त नैसर्गिक शेतीवर भर द्यावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी याच्या प्राची वर तिरंगा फडकविण्याआधी आज सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वर जाऊन आदरांजली वाहिली. लाल किल्ल्याच्या प्राची वरून 72 वर्षे स्वतंत्र भारताचे पंतप्रधान देशाला संबोधित करतात तो लाल किल्लाही या वर्षात आपला 370 आवा निर्मिती दिवस साजरा करतो आहे. लाल किल्ल्याच्या निर्मितीला 370 वर्षे पूर्ण होणे आणि याचवेळी घटनेतील 370 वे कलम मोदी सरकारने रद्द करणे हा दुर्मिळ असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

loading image