
या फोटोला 20 तासांपेक्षा कमी काळात 10 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले. तर 16 हजारांहून अधिक जणांनी हा फोटो शेअर केलेला आहे. तब्बल 54 हजार कमेंट्स या फोटोवर आले आहेत.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या टि्वटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल प्लॅटफॉर्मसवर चाहत्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. पंतप्रधान मोदी स्वतः अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय असतात. नुकताच पंतप्रधानांनी आपल्या फेसबुकवर एक फोटो शेअर केला आणि काही तासांतच या फोटोने सर्व विक्रम मोडले. पंतप्रधान मोदी हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोलकाता येथे गेले होते. तेव्हाचा हा फोटो त्यांनी शेअर केला होता.
या फोटोला 20 तासांपेक्षा कमी काळात 10 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले. तर 16 हजारांहून अधिक जणांनी हा फोटो शेअर केलेला आहे. तब्बल 54 हजार कमेंट्स या फोटोवर आले आहेत. या फोटोत पंतप्रधान मोदी हे विमानातून बाहेर येताना दिसत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी साधा कुर्ता-पायजामा परिधान केलेला आहे. त्यांनी अंगावर शाल घेतलेली दिसत आहे. नेताजी बोस यांना श्रद्धांजली देण्यासाठी कोलकाताला पोहोचलो आहे, अशी कॅप्शन त्यांनी या फोटोला दिली आहे. पंतप्रधानांनी व्हिक्टोरिया मेमोरियल येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान अनेक बंगाली चित्रपट कलाकारांशी चर्चाही केली होती.
हेही वाचा- 'संपूर्ण देश तुम्हाला धन्यवाद देईल'; शेतकऱ्याचे PM मोदींच्या आईला भावुक पत्र
नेताजी भवनचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निवासस्थानाचा दौरा केला आणि त्यानंतर ते 'पराक्रम दिवस' साजरा करण्यासाठी व्हिक्टोरिया मेमोरियलला पोहोचले. तेथील भवानीपूर परिसरातील नेताजी भवनला गेल्यानंतर सुगतो बोस आणि त्यांचे भाऊ सुमंत्रो बोस यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. हे दोघेही नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू आहेत. आझाद हिंद सेनेशी निगडीत फोटोंच्या संग्रहालयाला त्यांनी भेट दिली.